Raj -Udhav Thackeray : मराठी माणूस सुखावला, राज ठाकरे-उद्धव ठाकरे लग्न सोहळ्यात एकत्र, साधला संवाद, राजकीय मोट कधी बांधणार?

राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांनी साधला संवाद

मुंबईतील दादरमध्ये राज ठाकरे यांच्या बहि‍णीच्या मुलाचा लग्न सोहळा संपूर्ण राज्यासाठी सुखद ठरला आहे. कारण या लग्न सोहळ्यात दोन मामा, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहे. दोन्ही भावांनी यावेळी कौटुंबिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने संवाद साधला. हे दृश्य पाहुन मराठी माणूस सुखावला. टोकाच्या भूमिकेनंतर दोन्ही भावांची भेट चर्चेचा विषय ठरली आहे. या दोघांनी एकत्र यावे अशी आर्त हाक यापूर्वी सुद्धा मराठी माणसाने दिली आहे. यापूर्वी राज ठाकरे यांनी एकत्र येण्यासंबंधी संकेत दिले होते. एकमेकांचे कट्टर दुश्मन एकत्र येऊ शकतात, पण उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळच वाटते असं त्यांचं वक्तव्य चर्चेत आलं होतं.

बातमी अपडेट होत आहे…

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)