राज ठाकरे ते शिंदे व्हाया फडणवीस, राऊतांची जोरदार फटकेबाजी, म्हणाले वाचमनच्या…

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा हाती घेतला. बँका आणि  इतर अस्थापनांमध्ये जाऊन तपासा मराठी भाषेचा वापर होतो की नाही असे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले होते. दरम्यान मराठी भाषेच्या मुद्द्यावरून बँकेमध्ये मारहाणीची घटना देखील घडली होती. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत? 

त्यांनी त्यांच्या राजकारणाची परंपरा पाळली,  त्यांना शुभेच्छा आहेत. परंपरा मी सांगायला पाहिजे का ?  मराठीचे आंदोलन म्हणणार नाही. आम्ही पण आंदोलनं केली आहेत.  आम्ही पण लोकांच्या कानफडात मारल्या आहेत. बँका, आस्थापने, राष्ट्रीय स्तरावर मराठी मुलांना यश मिळावे यासाठी क्लासेस चालविले आहेत.  शिवसेना भवनात आम्ही मुलांची मानसिक तयारी केली, आणि नंतर आम्ही आंदोलनं केली, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,  आम्ही कुणाच्या कानफडात मारली तर ती एअर इंडियाच्या चेअरमनच्या. वॉचमनाला नाही मारले. प्रमुखांच्या खानाखाली मारली पाहिजे.  वॉचमनला मारून नाही होत. फडणवीस यांच्या कृपेने आंदोलन होत आहे. त्यांनी कधी आंदोलन केलं आहे का?

राज्य सरकारचा भंपकपणा सुरू आहे. मुख्यमंत्रिपदासाठीही लेव्हल लागते. दर्जा लागतो. मुख्यमंत्रिपदाची यांची लेव्हल नाही. चव्हाण, नाईक, पवार, जोशी यांची लेव्हल होती. असा खोचक टोला यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता त्यांना लगावला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे.  त्यांचा संशयी पक्ष आहे, इसंशी म्हणतो, दुसरा कोणी असता तर हिंदू धोक्यात आले असते. ओवेसीला ठाण्यात येण्याचे आमंत्रण दिलं आहे. टेम्भी नाक्यावर सत्कार करणार आहेत. मामलेदारची मिसळ खायला देणार आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)