Sanjay Raut on Raj Thackeray: मनसे नेते राज ठाकरे यांनी बँकांमध्ये मराठी बोलले जात नसल्याच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरु करण्याचे आदेश गुढीपाडवा मेळाव्यात दिले होते. त्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी बँकांमध्ये जाऊन मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले होते. आता दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी पत्र काढून आंदोलन थांबवण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. त्यावर शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. संजय राऊत यांनी एका वाक्यात त्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘तुम्हालाही माहीत आहे. आम्हालाही माहीत आहे. त्यात काय चालतेय.’
काय म्हणाले संजय राऊत?
खासदार संजय राऊत यांनी अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प विरोधात सुरु असलेल्या आंदोलनावर बोलताना सांगितले की, अमेरिकेप्रमाणे भारतात रस्त्यावर लोक उतरणार आहे. त्याठिकाणी ट्रम्प यांच्याविरोधात लोक जसे रस्त्यावर उतरले आहे तसे भारतात होईल. अमेरिकेच्या ५० राज्यांत लाखो लोक रस्त्यावर आले आहेत. तसाच प्रकार देशातील लोकशाही वाचवण्यासाठी भारतात लोक करतील, असे भाकीत त्यांनी वर्तवले.
शेअर बाजार सोमवारी तीन हजार अंकांनी कोसळला. त्यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले, बाजार कोसळत असताना मोदी विदेशात फिरत आहे. त्यांचे अंध भक्त कौतूक करत आहे. वक्फ बोर्डाचा विषय आमच्यासाठी संपला आहे. परंतु त्यात आज मुस्लमांची संपत्ती गेली. उद्या ख्रिश्चिन लोकांची संपत्ती जाईल. त्यानंतर बौद्ध, जैन लोकांची संपत्ती जाईल. देवस्थांनांच्या जमीनीवर यांचा डोळा आहे, असे उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांनी म्हटले आहे, ते सत्य आहे.
या विधेयकाविरोधात इंडिया आघाडीतील काही लोक कोर्टात गेले आहेत. उद्या हे लोक बुध्दगयावर दावा करतील. भाजपचे लोक चैत्याभूमीवर जातील हे तिथेही दावा सांगतील. संसेदत आम्ही या बिलाविरोधात आम्ही मतदान केले आहे. कारण हे विधेयक जमिनीसाठी आणले आहे. या जमिनी आपल्या उद्योगपतींना टॉवर बांधण्यासाठी देतील, असा दावा राऊत यांनी केला.