उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. या ऋतूत, तीव्र सूर्यकिरणे, घाम आणि प्रदूषण यामुळे त्वचा निर्जीव दिसते. त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. पुरळ येणे, मुरूम यासारख्या समस्येमुळे चेहऱ्याची चमक कमी होते. अशातच तुम्हाला यापासून सुटका मिळवण्यासाठी व उन्हाळ्यात त्वचेला ताजेपणा आणि चमक द्यायची असेल तर रात्री झोपण्यापूर्वी काही घरगुती उपाय करणे खूप फायदेशीर ठरू शकते.
चमकदार त्वचा मिळविण्यासाठी, बहुतेक लोकं ब्युटी ट्रिटमेंट त्वचेवर करतात. पण उन्हाळ्यात त्वचेला जास्त हायड्रेशनची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत तुम्ही ऑर्गेनिक गोष्टींच्या मदतीने चेहरा चमकदार करू शकता. तसेच या ऑर्गेनिक उपायांमुळे त्वचेचे कोणते नुकसान होणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात…
कोरफड
कोरफड त्वचेला थंडावा आणि ओलावा प्रदान करते. कोरफड त्वचेची जळजळ, सूज आणि लालसरपणा कमी करण्यास मदत करते. याकरिता उन्हाळ्यात कोरफड जेल वापरणे खूप फायदेशीर आहे. रात्री झोपण्याआधी तुमची त्वचा पूर्णपणे स्वच्छ करा. त्यानंतर हलक्या हातांनी तुमच्या चेहऱ्यावर ताजे कोरफड जेल लावा.
नारळाचे तेल
नारळाचे तेल त्वचेसाठी एक उत्तम मॉइश्चरायझर आहे. हे त्वचेला खोलवर पोषण देते आणि रात्रभर त्वचेला ओलावा देते. उन्हाळ्यात त्वचा कोरडी आणि डिहायड्रेटेड होऊ शकते, म्हणून चेहऱ्यावर नारळाचे तेल लावल्याने त्वचा ओलावा टिकून राहण्यास मदत होते. यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार होते. तथापि, जर तुमची त्वचा तेलकट असेल तर नारळाचे तेल कमी प्रमाणात लावा.
गुलाब पाणी
गुलाबपाणी त्वचेला ताजेतवाने करते. हे एक नैसर्गिक टोनर आहे जे त्वचेचे छिद्र मोकळे करण्यास मदत करते. उन्हाळ्यात चेहऱ्यावर गुलाबपाणी लावल्याने त्वचा थंड होते. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही चेहऱ्यावर गुलाबपाणी स्प्रे करू शकता किंवा कापसाच्या साहाय्याने लावू शकता. यामुळे त्वचा ताजी आणि घट्ट होते.
कच्चे दूध
तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर कच्चे दूध देखील लावू शकता. यामुळे चेहरा हायड्रेट राहील आणि पोषणही मिळेल. चेहऱ्यावर नियमितपणे कच्चे दूध लावल्याने त्वचेचा रंगही सुधारू शकतो. रात्री कापसाच्या मदतीने कच्चे दूध चेहऱ्यावर लावा. रात्रभर तसेच राहू द्या आणि सकाळी पाण्याने चेहरा धुवा. काही दिवसातच तुम्हाला याचा फरक दिसेल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)