पुरंदर तालुक्यातील विमानतळासाठी जमिनी संपादन करण्यास विरोध करण्यासाठी झालेल्या आंदोलनात महिलांनाही लाठीमार झाला. या प्रकरणात जखमी झालेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी पुरंदरच्या कुंभारवळण येथे खासदार सुप्रिया सुळे पोहचल्या आणि त्यांनी फेसबुक लाईव्ह केले. यावेळी त्या म्हणाल्या की पोलिस दलातही शेतकऱ्यांचीच मुले आहेत. या ठिकाणी कोणते पोलिस होते याची माहीती आपण एसपींना विचारुन महिलांवर लाठीमार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे.
पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात येत आहे.या विमानतळासाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादन केली जाणार आहे. मात्र, आपल्या जमिनी विमानतळासाठी देण्यास विरोध असून गेले दोन दिवस येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यात आला आहे. या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांना झालेल्या जखमा पाहील्या. या आंदोलनाचे व्हिडिओ पाहुन आपला विश्वास बसला नाही की आपल्या पुरंदर मधीलच हे व्हिडिओ आहेत का ? लोकांचा विमानतळाला विरोध नाही तर जमीन द्यायला विरोध आहे.जेथे जमीन मिळेल तेथे विमानतळ उभारावे असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई
आपण खरे तर इंदापूरला जाणार होतो. हा दौरा आपण रद्द करीत आहोत. आता करण्याची मागणी केली आहे. उद्या एसपीकडे जाईल तेव्हा कोणता पोलीस फोर्स होता याची माहिती घेणार आहे. पोलीस देखील शेतकऱ्यांची मुले आहेत. त्यांनी असे वागायला नको होते. महिलांना पण मारहाण झाली, पुरुष दाखवू शकतात. पण महिला आपल्या जखमा कशा दाखवणार असा सवाल यावेळी सुप्रिया सुळे यांनी केला. आपल्या पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी उद्याची १ वाजताची सासवडमध्ये भेटीची वेळ दिली असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना सांगितले.