Pune : पोषण आहारात सापडल्या अळ्या आणि उंदराची विष्ठा, लाभार्थी नागरिक संतापले

पुणे : दारिद्र्यरेषेच्या खाली येणाऱ्या लोकांना सरकार मार्फत काही सवलती देण्यात येतात. यामध्ये गरजू, गोरगरीब नागरिकांना विविध योजना सरकारने अधिवेशनात घोषित केल्या आहेत. मात्र प्रत्येक्षात नागरिकांना सगळे बोगस आणि दर्जाहीन सुविधा पोचत असल्याचे उदाहरण समोर आले आहे. पुण्यातल्या जनता वसाहत मधील अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलांना, महिला व बाल कल्याण विभाग मार्फत खराब पोषण आहार देण्यात आला आहे, ज्यामध्ये आळ्या आणि उंदराची विष्ठा सापडली आहे. या घटनेनंतर लाभार्थी नागरिक प्रचंड संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
Zika Virus : झिकाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सतर्कता, तिघांना लागण, २३ जणांचे रक्तनमुने तपासणीला

दोन दिवसांपूर्वी पुण्यातल्या जनता वसाहतीतील भागात राहणाऱ्या नागरिकांना हा पोषण आहार देण्यात आला होता. परंतु त्याच पोषण आहारात उंदराची विष्ठा आणि अळ्या सापडल्या आहेत. ही बाब राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रिक्षा संघटक अध्यक्ष संदीप काळे यांनी घटना उघडकीस आणली.दोन दिवसांपूर्वी एकात्मिक बाल योजना मंडळ अंतर्गत हे धान्य वाटप करण्यात आले होते. ही संस्था महिला व बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत येत असून, ज्या पाकिटातून हे धान्य वाटप करण्यात आले आहे. त्यावर शासनाचा अधिकाऱ्यांचा शिका सुद्धा दिसत आहे.

संबंधित महिलेने हाच पोषण आहार शिजवण्यासाठी घेतल्यानंतर त्यामध्ये अळी आढळली आणि निरखून पाहायला नंतर त्यामध्ये उंदराची विष्ठा आढळून आली. संबंधित महिलेने संताप व्यक्त करत तक्रार दिली आणि पोषण आहार मिळलेल्या लाभार्थींना पण सतर्क करण्यात आले आहे. सरकार गोगरीब नागरिकांच्या जीवाशी खेळ करत आहे का ? असा प्रश्न आता संबंधित नागरिक विचारत आहे.