Pune Train Block:  पुणेकरांसाठी मोठी अपडेट, रेल्वेने प्रवास करणार असाल तर…; इतक्या गाड्या केल्या रद्द

प्रतिनिधी, पुणे

पुणे-लोणावळा मार्गावर कामशेत-तळेगाव दरम्यान असलेल्या पुलाचा लोखंडी गर्डरच्या कामासाठी रविवारी मेगा (९ जून) ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-लोणावळासह डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस या गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्या आहेत. पाच गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.

रद्द असणाऱ्या लोकल

०१५६४ पुणे-लोणावळा लोकल
०१५६१ लोणावळा-पुणे लोकल
०१५६३ लोणावळा-शिवाजी नगर- लोकल
⁠०१५६६ पुणे-लोणावळा लोकल
०१५८८ शिवाजी नगर-तळेगाव लोकल
०१५८९ तळेगाव-पुणे लोकल

रद्द होणाऱ्या एक्स्प्रेस

११००७ मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस.
११००८ पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस
१२१२३ मुंबई-पुणे डेक्कन क्वीन सुपरफास्ट एक्स्प्रेस
१२१२४ पुणे-मुंबई डेक्कन क्वीन सुपरफास्ट एक्स्प्रेस