Pune Traffic : जड वाहतूकबंदीकडे पोलिसांचे दुर्लक्ष; वाहतूक कोंडीत भर, पुण्यात अशी येतात जड वाहने

प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जड वाहतूकीला (मल्टी अॅक्सल वाहने) शहराच्या हद्दीत सकाळी आठ ते रात्री दहा या दरम्यान बंदी घालण्याचा आदेश पुणे वाहतूक पोलिसांनी काढला, तर शहराच्या मध्यवस्तीमधील गर्दीच्या रस्त्यावर ठरावीक वेळेतच जड वाहनांना प्रवेश दिला जाणार असल्याचे आदेश काढून स्पष्ट केले; पण या आदेशांकडे वाहतूक पोलिसांचे पूर्ण दुर्लक्ष होत आहे. मध्य वस्तीमध्ये दिवसादेखील जड वाहने फिरताना दिसत असून, त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.शहराच्या मध्यवस्तीमधील बाजारपेठ व गर्दीच्या रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी जड वाहनांना बंदीचा आदेश काढला आहे. बाजारपेठेत दिवसा माल-चढ उतार करण्यासदेखील बंदी घातली आहे. तरीही अनेक ठिकाणी दिवसा मालाची चढ-उतार होताना दिसते.

Pune News : अभ्यासक्रम आराखड्यातून मराठी भाषेला वगळलं? भाषा विषय पर्यायी ठेवण्यावर अभ्यासकांकडून टीका
मध्य भागात जड वाहने फिरताना दिसतात. तसेच, कन्स्ट्रक्शन सुरू असलेल्या ठिकाणचा राडा-रोडा, सिमेंट मिक्सर अशी वाहनेदेखील दिवसा सर्रासपणे गर्दीच्या रस्त्यावरून जाताना दिसतात; पण ती वाहतूक पोलिसांना नेमकी कशी दिसत नाहीत. त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. या वाहनांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. या वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांना कोण जबाबदार, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

अशी येतात जड वाहने पुण्यात

– बाहेरील शहरातून येणाऱ्या अवजड वाहनांना पुण्यात दिवसा प्रवेश बंद करण्याचा आदेश आहे; पण बरीचशी वाहने दिवसादेखील हडपसरमार्गे खराडी बायपास, नगर रस्त्यावरून जातात.

– सिंहगड रस्ता, सोलापूर रस्तामार्गेही अवजड वाहने शहरात येतात

– काही वाहने पिंपरी-चिंचवड ओलांडून पुण्यात येतात.