श्रेयाचा वाद नाही. संपूर्ण टीमने केलेलं हे काम केलंय. पोलिस अधिकारी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होते. टीम तिथे तळ ठोकून होती. काही अधिकारी तीन दिवस तिथे होते. काही अधिकारी झोपलेही नाही. सर्व पोलीस आणि अधिकारी एकत्र होते. गावातील नागरिकांनी सहकार्य केलं. आम्ही त्यांचे आभारी आहोत. आम्ही गावात भेट देऊन नागरिकांचा सत्कार करणार आहोत. असं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हंटलं आहे. स्वारगेट अत्याचार घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडे याला काल पोलिसानी अटक केली आहे. त्यानंतर आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.
पुढे बोलताना अमितेश कुमार यांनी सांगितलं की, स्वारगेट पोलीस स्टेशन, क्राईम ब्रांच अंदाजे ५०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ऑपरेशनमद्ये होते. तीन दिवसापासून गुनाट गावातील ४०० ते ५०० स्थानिक लोकांचं सहकार्य मिळालं. आम्ही गावकऱ्यांचे आभारी आहोत. आम्ही गावात भेट देऊन नागरिकांचा सत्कार देखील करणार आहोत, असंही त्यांनी म्हंटलं.