स्वारगेट अत्याचार घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी पुण्यात कॉँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत. पुण्यातील लाशक्त पोलीस स्टेशन बाहेर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे.
स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी दत्तात्रय गाडे याला काल पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर त्याला पुण्याच्या लष्कर पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. काही वेळातच आरोपी दत्त गाडे याला कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. तत्पूर्वी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी पोलीस स्टेशन बाहेर कॉंग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.