Pune Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट, आरोपी दत्ता गाडेचा खोटेपणा उघड, पोलिस तपासात काय झालं उघड ?

आरोपी दत्ता गाडेचा खोटेपणा उघड

पुण्यातील स्वारगेट बस स्टँड परिसरातील शिवशाही बसमध्ये गेल्या आठवड्यात एका 26 वर्षांच्याा तरूणीवर अत्याचार करण्यात आल्याने मोठी खळबळ माजली होती. अत्याचाराच्या या घटनेनंतर आरोपी असलेला दत्तात्रय गाडे हा फरार झाला होता. तो पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी आहे. अखेर शुक्रवारी पोलिसांनी त्याच्या गावात जाऊन दत्ताच्या मुसक्या आवळल्या आणि अटक केली. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला पोलिस कोठडीही सुनावण्यात आली. आता या प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. आरोपी दत्ता गाडे याने स्वत:ला निर्दोष सांगत अनेक दावे केले होते, मात्र त्याचे सर्व दावे खोटे ठरले आहेत. त्याची खोटी बाजू समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दत्ता गाडेने पीडित तरुणीवरच खळबळजनक आरोप केले होते. मी तरुणीवर कुठलीही बळजबरी केली नाही. तिनेच मला बोलावले आणि आम्ही बसमध्ये गेलो. तिने माझ्याकडून साडेसात हजार रुपये घेतले, असा दावा त्याने केला होता. एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी तरुणीचा एक एजंटही उपस्थित होता. पिडीत तरुणीवर बलात्कार झालाच नाही असा दावा आरोपी दत्ता गाडे याने केला होता. मात्र दत्ताने ज्या तरूणीला साडेसात हजार रपये असा दावा केला, त्याच दत्ता गाडेच्या बँक खात्याची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्याच्या खात्यात फक्त 249 रुपये शिल्लक असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. त्यामुळे त्याने तरूणीला पैसे दिल्याचा दावा पूर्णपणे खोटा ठरला आहे,

दत्ता गाडे आणि पीडित तरुणीचा कोणताही संपर्क नाही

एवढंच नव्हे तर त्याची आणखी एक खोटी बाजू समोर आली आहे. आपण पीडित तरुणीला महिनाभरापासून ओळखत होतो असा दावा दत्ता गाडेने वकिलांमार्फत केला होता. त्यामुळे या दोघांच्या फोन कॉलची चौकशी व्हावी, अशी मागणी दत्तात्रय गाडे याच्या वकिलांनी केली होती. त्यानुसार पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडे याला अटक केल्यानंतर त्याच्या आणि पीडितेच्या मोबाईलचे दोन वर्षांचे सीडीआर डिटेल्स तपासले आहेत. मात्र त्यामध्ये कुठेही संबंधित आरोपी आणि पीडिता हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे दत्ता गाडेचा आणखी एक खोटारडेपणा उघड झाला.

काय आहे नेमकं प्रकरण?

पुण्यामध्ये गेल्या आठवड्यात ही खळबळजनक घटना घडली. गेल्या मंगळवारी पहाटेच्या सुमारास एका तरुणीवर बालात्कार करण्यात आला. स्वारगेट स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. घटनेनंतर या प्रकरणातील आरोपी फरार झाला होता. आरोपी दत्ता त्याच्याच गावात लपून बसल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्याच्या शोधासाठी तब्बल 13 पथकं तैनात करण्यात आली होती, गावाला पोलीस छावणीचं स्वरुप प्राप्त झालं होतं. आरोपीवर पोलिसांनी बक्षिस देखील ठेवलं होतं. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं. गुणाट गावात घुसून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या, त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असता कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

तरूणीवर एकदा नव्हे दोनदा अत्याचार

त्या नराधमाने तरूणीवर दोनवेळा अत्याचार केला होता. पीडित तरुणीला कोणत्याही परिस्थितीत आपला जीव वाचवायचा होता. पहिल्यांदा बलात्कार केल्यानंतर पीडिता घाबरली, ती फार प्रतिकार करत नाही, ही गोष्ट दत्तात्रय गाडे याच्या लक्षात आली. तेव्हा नराधमाने दुसऱ्यांदा तिच्यावर अत्याचार केले. यावेळी तरुणी प्रचंड घाबरली होती. तिने काय करायचे ते कर पण मला जिवंत ठेव, अशी याचना दत्तात्रय गाडे याच्याकडे केली.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)