Pune Porsche Car Accident: अल्पवयीन लेकाला पोर्शे देणारा विशाल अगरवाल कोण?

पुणे: पुण्यात कल्याणीनगर येथे एका बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने आपल्या आलीशान पोर्शे कारने दोन इंजिनिअर्सना चिरडलं. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये इंजिनिअर तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर तरुणाने उपचारादरम्यान प्राण सोडले. या घटनेतील अल्पवयीन आरोपी हा मद्यप्राशन करुन कार चालवत होता. तसेच, तो अल्पवयीन असूनही कार चालवत होता. या प्रकरणी आता त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली असून नागिरकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल, कोझ बारमालक आणि मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.
आईने सांगितलं पाय मोकळे कर, फेरफटका अश्विनीच्या जीवावर; तर अनिसची वाट बघणाऱ्या डोळ्यांना आता अंत्यदर्शन

विशाल अगरवाल कोण आहेत?

विशाल अगरवाल हे पुणे, भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रातील एक प्रमुख व्यक्ती आहेत. ब्रम्हाकॉर्प या अग्रगण्य रिअल इस्टेट विकास कंपनीशी ते संबंधित आहेत. ते ब्रम्हा मल्टीकॉन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये संचालक पदावर आहेत आणि ब्रम्हा कॉर्पच्या छत्राखाली इतर अनेक उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी आहेत. त्याच्या पार्श्वभूमीमध्ये आर्थिक आणि हॉटेल व्यवस्थापनातील पदव्यांचा समावेश आहे आणि ब्रम्हा बिल्डर्सच्या बांधकाम विभागाचे संचालन करण्यात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, ज्यामुळे ब्रम्हा अव्हेन्यू, ब्रम्हा एक्स्युबरन्स आणि ब्रम्हा सनसिटी (ब्रम्हा कॉर्प) सारखे अनेक उच्च-प्रोफाइल प्रकल्प पूर्ण झाले आहेत. (कंपनीचेक) (ब्रम्हा रियल्टी) विशाल अगरवाल यांच्या योगदानाला सहस्राब्दीचा उद्योग रत्न आणि धरती रत्न यांसारख्या पुरस्कारांनी ओळखले गेले आहे, जे त्यांच्या महत्त्वपूर्ण कामगिरीवर आणि उद्योगातील उत्कृष्टतेची वचनबद्धता (ब्रम्हा रियल्टी) अधोरेखित करतात.

ब्रम्हा कॉर्प हे पुण्यातील नामांकिल बिल्डर्स आहेत. पुण्यातील कल्याणी नगर आणि नगर मार्गावर यांच्या अनेक साईट्स आहेत. या कंपनीचे फाऊंडर ब्रम्हदत्त अगरवाल आहे. तर रामकुमार अगरवाल, विनोद कुमार अगरवाल, दिनेश अगरवाल, हिमांशू अगरवाल, करण अगरवाल हे या कंपनीत डायरेक्टर आहेत. ब्रम्हा कॉर्पने पुण्यात आणि मुंबईत २००० हून अधिक टोलेजंग इमारती बांधल्या आहे. त्यांच्या सगळ्या इमारती आलिशान आहेत. २००३ मध्ये पुण्यात सनसिटीचा यशस्वी प्रोजेक्ट केला त्यानंतर हे बिल्र्डर्स पुण्यात नावाजाला आले. त्यांची ऑपरेटिव्ह रेवेन्यू रेंज साधारण १०० ते ५०० कोटी आहे. २०१२ पासून पब्लिक इनकॉर्पोरेट (PIC) कंपनी झाली (शेअर विकायला सुरुवात). पुण्यातील उच्चभ्रू परिसर असलेल्या कल्याणी नगर परिसरात त्यांचे सर्वात जास्त प्रोजेक्ट्स आहेत.