पुणे : रात्री उशिरा पुण्यातल्या कल्याणकारी परिसरात एका तरुणाने भरधाव वेगाने आलिशान पोर्श (Porsche) गाडीने दुचाकीला उडवलं प्रकरणी तरुण तरुणीचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहर हादरलं होतं. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आणि गुन्हा दाखल केला पण. कोर्टात आरोपीला हजर केल्यानंतर सुट्टीच्या कोर्टाने त्याला जमीन मंजूर केला.वेदांत अगरवाल (रा. ब्रम्हा सनसिटी) याने पोर्श (Porsche) कारने मोटारसायकल आणि इतर वाहनांना धडक दिली. शहरातील काही पब्स रात्री उशिरापर्यंत सुरु होते. कल्याणीनगर मधील Ballr पब मधून हे तरुण तरूणी आणि त्यांचे मित्र मैत्रिणी पार्टी संपल्यानंतर बाहेर पडले होते. तेव्हा रात्री उशिरा ३ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास कल्याणीनगरमध्ये हा अपघात झाला. चारचाकी पोर्शे चालवणारा तरुण हा अल्पवयीन मुलगा होता, असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. तर अनिस अहुदिया, अश्विनी कोस्टा असं मृत्यू झालेल्या तरुण तरुणीची नावं आहेत. घटनास्थळी रात्री उशिरा पोलीस दाखल झाले आणि पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली.
पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांच्या गुन्हा दाखल त्याच्यावर जामीला पात्र असणारे गुन्हे दाखल केले. म्हणून काल रविवारी सुट्टीच्या कोर्टात आरोपीला हजर केल्यावर त्याला जमीन मंजूर झाला.