Pune News : विद्यार्थ्यांना आता करता येणार भू-राज्यशास्त्रात एमएससी, नेमका अभ्यासक्रम काय आहे?

प्रतिनिधी, पुणे : जगभरातील भू-राजकीय परिस्थितीचा आणि भू-अर्थशास्त्राचा अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. पुण्यातील ‘गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थे’तर्फे एमएससी अर्थशास्त्र अंतर्गत नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून, यामध्ये विद्यार्थ्यांना भू-राज्यशास्त्र आणि भू-अर्थशास्त्र या विषयांमध्ये स्पेशलायजेशन करता येणार आहे. अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया संस्थेच्या वेबसाइटद्वारे सुरू करण्यात आली आहे.सध्या जगभरात अनेक घडामोडी घडत असून, आगामी काळात त्याचा भू-राजकीय परिस्थितीवर परिणाम होणार असून, भू-अर्थशास्त्रावरही त्याचे मोठे परिणाम दिसून येणार आहेत. अमेरिका, चीन या दोन महासत्तांमध्ये उद्योग, अर्थकारण, जागतिक प्रभाव यावरून सुरू असलेले राजकारण याचे उत्तम उदाहरण आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही विषयांची गरज लक्षात घेऊन भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक राजकीय आणि अर्थशास्त्रीय परिस्थितीचे ज्ञान व्हावे, या दृष्टिकोनातून हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

Pune Crime : राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; पुण्यातील आणखी ६६ पब, बारला ठोकले टाळे

अभ्यासक्रमात नेमके काय?

– या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा असून, यामध्ये पुस्तकी अभ्यासक्रमाबरोबरच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचाही अनुभव विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.

– या शिवाय भू-राज्यशास्त्र, भू-अर्थशास्त्र यामधील जगभरातील कोणताही विषय घेऊन त्यावर संशोधन करण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात येईल.

– अभ्यासक्रमासाठी गोखले संस्थेतील प्राध्यापकांबरोबरच अन्य क्षेत्रांत कार्यरत तज्ज्ञ प्राध्यापक अध्यापन करणार असून, भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) व भारतीय परराष्ट्र सेवेतील (आयएफएस) वरिष्ठ अधिकारीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.