Pune News: कॉंग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; बॅनरबाजीवरुन कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, एकाला अटक

पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये पुण्याच्या जागेवरील पराभवानंतर नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडणार होती. मात्र यापुर्वीच एका कार्यकर्त्याच्या बॅनरमुळे मोठा वाद रंगला. बॅनर झळकवणाऱ्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचं डोकं फुटलं आणि कार्यकर्ता रक्तबंबाळ झाला. मुख्य म्हणजे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज पुण्यात दौऱ्यावर असताना हा सगळा प्रकार घडला आहे. मारहाण करणारे पाच ते सहा कार्यकर्ते होते. यामधील एका कार्यकर्त्याला पळून जात असताना पोलिसांनी पकडलं असून ताब्यात घेतलं आहे.
विधानसभेच्या उमेदवारीसाठी शिंदे गटात रस्सीखेच; कल्याणची जागा लढवण्यास इच्छुक, पदाधिकाऱ्याच्या वक्तव्यानं खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश मधुकरराव धिवार असं त्या कार्यकर्त्याच नाव आहे. पुणे काँग्रेसचा जुना पदाधिकारी आहे. अनुसूचित जाती आणि जमाती विभागाचा माजी अध्यक्ष आणि आता राहुल प्रियांका गांधी सेना राज्य प्रमुख आहे. आबा बागुल यांनी भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या दरम्यान देखील काँग्रेस भवनबाहेर बॅनर झळकवले होते. तर आज पुन्हा एक बॅनर त्याच्याकडून झळकवण्यात आलं आहे. ज्या मध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची नाव लिहिण्यात आली आणि प्रश्न विचारण्यात आला की आता तरी या जगामध्ये बदल होणार का नाही?यामध्ये पाहिलं नाव होतं ते काँग्रेसचे माजी मंत्री राहिलेले, उल्हास पवार, पुन्हा एक जेष्ठ मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, माजी शहर अध्यक्ष रमेश बागवे, माजी नगरसेवक अभय छाजेड, माजी महापौर दीप्ती ताई चौधरी, माजी महापौर कमल ताई व्यवहारे, काँग्रेस नेते वीरेंद्र किरड, काँग्रेस नेते संजय बालगुडे. अशा नेत्यांचा नाव आणि उल्लेख त्या बॅनर वर होता. परंतु माहिती अशी मिळत आहे की ज्या नेत्याचा त्या बॅनरवर नाव नव्हतं त्यांच्या कार्यकर्त्यानी मारहाण केली.

काँग्रेस पक्ष लोकशाही आणि संविधान मानणारा पक्ष आहे. असं सातत्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून आणि तळा गळतल्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून म्हटलं जातं. परंतु अपल्याच पक्षातील कार्यकर्त्यानी संविधानाप्रमाणे केलेली मागणी काँग्रेसच्या त्या नेत्याला का सहन नाही झाली. असं प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. मारहाण करणाऱ्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. परंतु मारहाण झालेल्या मुकेशने अजून तक्रार दाखल केली नाही.