Pune News : आंतरराष्ट्रीय महिला दिनीच पुण्यात BMW कारमधील तरुणांचे रस्त्यावर अश्लील चाळे, VIDEO

पुण्यात सध्या गुन्हेगारीच प्रमाण वाढत चाललं आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. पुण्यात घडणाऱ्या घटना पाहिल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर पुण्यात काय चाललय? असा प्रश्न पडतो. मागच्याच आठवड्यात पुण्यात स्वारगेट एसटी डेपो परिसरात एका बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला. त्यानंतर पुण्यात टॅक्सीने प्रवास करणाऱ्या एका महिलेला असाच अनुभव आला. तिने सिग्नलला टॅक्सी थांबल्यानंतर पळत जाऊन पोलीस ठाण गाठलं. आता पुण्यात सकाळच्या वेळेला BMW कारमधील मद्यधुंद अवस्थेत एका तरुणाने रस्त्यावर अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. महत्त्वाच म्हणजे आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे. याच दिवशी ही घटना घडली.

गाडीत बसलेला हा चालक मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत होता. येरवडा भागांमध्ये शास्त्रीनगर चौकात स्त्रियांच्या समोर त्याने अश्लील चाळे केले. हा आणि आतमधील त्याचा मित्र दोघेही दारू प्यालेले होते. अश्लील चाळे करुन झाल्यावर दोघे फुल स्पीडमध्ये गाडी चालवत वाघोलीच्या दिशेने गेले. सकाळच्या सुमारास तरुणाने एका सिग्नलवर ही अश्लील हरकत केली. पुणे नगर रोडवरील शास्त्रीनगर चौकात ही घटना घडली. दोन्ही व्यक्ती BMW कारमध्य बसल्या होत्या. या कारचा नंबर MH-12 RF8419 आहे.

कॅबमध्ये काय घडलेलं?

पुण्यात याआधी सुद्धा महिलांविरोधात अनेक गंभीर गुन्हे घडले आहेत. मागच्या आठवड्यात आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या एका महिलेने कामावरुन घरी जाण्यासाठी टॅक्सी पकडली होती. कॅब चालकाने आरश्यामधून पीडितेला पाहत अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. एका सिग्नलवर कॅब थांबताच तिथून पळ काढला आणि थेट खडकी पोलीस स्टेशन गाठत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तात्काळ तपास करत महिलेनं ज्या अँप वरून कॅब बुक केली त्या माहितीच्या आधारे वाहन क्रमांक घेत कॅब चालकाला अटक केली. 21 फेब्रुवारीची ही घटना आहे आरोपीला नंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)