Pune News : पुण्यात कॅब चालकाच धक्कादायक कृत्य, आयटी प्रोफेशनल महिलेने टॅक्सीतून काढला पळ

पुण्यात सध्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनला आहे. पुण्यातील घडलेल्या दोन घटनांमुळे कायद-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पुण्यात फलटणला जाणाऱ्या एका तरुणीवर स्वारगेट एसटी डेपो परिसरात एका शिवशाही बसमध्ये अत्याचार झाला. गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या एका आरोपीने सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान बसमध्ये तरुणीवर बलात्कार केला. पुण्यासारख्या विकसित आणि सतत वदर्ळ असलेल्या स्वारगेट डेपो परिसरात अशी घटना घडणं एक गंभीर बाब आहे. आता पुण्यात टॅक्सीने प्रवास करणाऱ्या एका महिलेला सुद्धा असाच विचित्र अनुभव आला.

ही महिला आयटी क्षेत्रातील प्रोफेशनल आहे. तिने सिग्नलला टॅक्सी थांबताच त्यातून लगेच उतरली व दोन किलोमीटर अंतर पळत जाऊन पोलीस स्टेशन गाठलं. पुण्यातील या दोन घटना महिला सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेबद्दल अनेक प्रश्न निर्माण करणाऱ्या आहेत. पुण्यातील खडकी पोलीस ठाण्यात एका महिलेने कॅब चालकांविरोधात अश्लील हावभाव केले म्हणून गुन्हा दाखल केलाय. ही घटना 21 फेब्रुवारीची असून पीडित महिला ही एका आयटी कंपनीत कार्यरत आहे. काम संपवून आपल्या घरी जाण्यासाठी तिने एक कॅब बुक केली होती. पीडित महिला त्या कॅबमध्ये बसून इच्छित स्थळी जाण्यासाठी निघाली असता कॅब चालक सुमित कुमार याने आपल्या कॅबमधील आरश्यामधून पीडितेला पाहत अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली.

कधी घडली ही घटना?

आरोपी चालक सुमित कुमार यानें अश्लील हावभाव केल्यानंतर पीडित घाबरली आणि तिने एक सिग्नल वर कॅब थांबताच तिथून पळ काढला आणि थेट खडकी पोलीस स्टेशन गाठत आरोपी सुमित कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तात्काळ तपास करत महिलेनं ज्या अँप वरून कॅब बुक केली त्या माहितीच्या आधारे वाहन क्रमांक घेत कॅब चालकाला अटक केली. 21 फेब्रुवारीची ही घटना आहे आरोपी सुमित कुमार याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)