Pune News : पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून चार्जिंग स्टेशन उभारणीस गती, ‘या’ ठिकाणी होणार चार्जिंग स्टेशन

प्रतिनिधी, पिंपरी : इलेक्‍ट्रिक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने इलेक्‍ट्रिक वाहने चार्जिंग करण्यासाठी २२ ठिकाणी खासगी एजन्सीद्वारे ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणारण्याला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘स्वत: बांधा आणि संचलित करा’ या तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

महापालिकेमार्फत ईव्ही चार्जिंग स्टेशन आठ वर्षे कालावधीसाठी २२ ठिकाणी वाजवी दराने वेगवेगळ्या एजन्सींकडून उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. या ठिकाणी इलेक्‍ट्रिक वाहनांची चार्जिंग सुविधा वाजवी दराने उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. त्या अनुषंगाने गेल्या वर्षीपासून तयारी केली जात आहे. मात्र, काही कारणांमुळे या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. आता नव्याने या प्रस्तावाला गती देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

Pune News : अभ्यासक्रम आराखड्यातून मराठी भाषेला वगळलं? भाषा विषय पर्यायी ठेवण्यावर अभ्यासकांकडून टीका

चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या एजन्सींना महापालिकेकडून फक्त जागा उपलब्ध करून देण्यात येईल. या जागेवर आठ वर्षासाठी स्वत:च्या खर्चाने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा घेणे, ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणे आणि संचलन व देखभाल करणे या बाबी एजन्सीने करणे आवश्‍यक राहील. या एजन्सीने ग्राहकांसाठी कमाल मर्यादा दरावरील महसुली वाटणीतील काही प्रमाणात रक्कम महापालिकेला देणे आवश्‍यक आहे. महसुली वाटणीतील अधिकतम रक्कम देणाऱ्या एजन्सीला काम देण्याचे नियोजन आहे. इलेक्‍ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी शहरातील २२ ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत.

या ठिकाणी होणार चार्जिंग स्टेशन

पिंपरी येथील महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीचे प्रांगण, पिंपरीतील सीट्रस हॉटेलजवळ, दुर्गादेवी टेकडी (निगडी), वाहतूकनगरी, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम (नेहरूनगर), निसर्ग निर्माण सोसायटी रिलायन्स मार्टजवळ (कोकणे चौक, पिंपळे सौदागर), आरटीओ कार्यालय (चिखली), बर्ड व्हॅली (संभाजीनगर), आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल (भोसरी), मलनिस्सारण केंद्र (चिखली), लांडेवाडी नाशिक रोड-टेल्को रोड जंक्‍शन, भक्ती शक्ती

बस टर्मिनल (निगडी), बजाज ऑटोजवळ, एचए कंपनी सब वेजवळ, संत तुकाराम मेट्रो स्टेशनच्या चौथ्या प्रवेशद्वाराजवळ, पी. के. चौक (पिंपळे सौदागर), योगा पार्क विबग्योर शाळा (पिंपळे सौदागर), राजमाता जिजामाता उद्यान पार्किंग (प्रभातनगर, पिंपळे गुरव), संतनगर उद्यान (कासारवाडी),

बी. डी. किल्लेदार गार्डन (वल्लभनगर), ऑटो क्लस्टर, सायन्स पार्क, राजश्री शाहू गार्डन.