Pune News : टेम्पोमध्ये दाटीवाटीने ७४ म्हशी, पोलिसांना कुणकुण; छापा टाकताच… पुण्यात मोठी कारवाई

प्रशांत श्रीमंदीलकर, जुन्नर, पुणे : जुन्नर तालुक्यातील खुबी परिसरात तब्बल पाच आयशर टेम्पो भरून ७४ म्हशींची कोणतीही परवानगी न घेता वाहतूक केली जात होती. मात्र ७४ म्हशींची वाहतूक करणाऱ्या पाच टेम्पोवर पोलिसांनी कारवाई केली आहे. टेम्पोमध्ये अगदी दाटी वाटीने भरल्याने परिस्थितीत म्हशी होत्या. यापैकी दोन म्हशींचा मृत्यू झाला आहे. या प्रकारनी ओतूर पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला असून, यापैकी सहा जणांना ताब्यात घेतलं आहे.

टेम्पो चालक मोहम्मद वकील इकरार खान, तोहीत वाहिद कुरेशी, उस्मानखान रमजान खान, रशीद अब्दुल रहीम शेख, फिरोज सोहराब मलिक, फारुक कुरेशी, मोहम्मद बिलाल भाईमिया शेख यांच्या पैकी सहा जणांना ताब्यात घेतलं असून ओतूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Dharavi Redevelopment : मोठी बातमी : धारावीची जमीन शासनाच्या खात्यांना हस्तांतरित करणार, अदानी समूह केवळ पुनर्विकास करणार
याबाबत अधिक माहिती अशी की, ओतूर परिसरात पोलिसांची नाकाबंदी सुरू होती. त्यावेळी पोलिसांना पाच आयशेअर टेम्पो भरून बेकायदा म्हशींची वाहतूक केली जातं असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी या वाहतूक कारणाऱ्या टेम्पोंना खुबी गावाजवळ पकडलं. पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता जवळपास ७४ म्हशी या पाच टेम्पोमध्ये असल्याचं दिसून आलं. त्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तींना ताब्यात घेऊन म्हशींची सुटका केली, त्यातील दोन म्हशींचा मृत्यू झाला आहे. इतर म्हशींना गो शाळेत पाठवण्यात आलं आहे.
Nagpur News : भरपावसात मृतदेह कारखान्यासमोर, तणावाची स्थिती; अखेर कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाखांची मदत सुपूर्द

ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, अनिल केरूरकर, पोलीस हवलदार महेश पटारे, भरत सूर्यवंशी,महेश झनकर, दिनेश साबळे, शंकर कोबल, नामदेव बांबळे, सुरेश गेंगजे, नदीम तडवी, संदीप लांडे, बाळशीराम भवारी, विलास कोंढवळे, मनोज राठोड, रोहित बोंबले, सुभाष केदारी, शामसुंदर जायभाये, ज्योतीराम पवार, विश्वास केदार, धनंजय पालवे, किशोर बर्डे, आशिष जगताप, विशाल गोडसे, अंबुदास काळे, राजेंद्र बनकर, भारती भवारी, सीमा काळे पोलीस मित्र शंकर अहिनवे यांच्या पथकाने केली आहे. महारष्ट्रातील पहिलीच दमदार कामगिरी केली आहे.