त्यामुळे, विमान प्रवासासाठी निघताना, साडेतीन तास आधी घरातून निघावे, असे आवाहन विमानतळ प्रशासनाने केले आहे. शहरात पावसामुळे अनेक रस्त्यावर व चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. खास करून विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. नगर रस्त्यावरील विमानतळ रस्त्यापासून ते पाठीमागे संगमवाडी, पुणे स्थानकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांना या वाहतूक कोंडीत दीड ते दोन तास अडकून पडावे लागले.
आपले विमान चुकते काय, अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर अनेक प्रवाशांनी खाली उतरून विमानतळाकडे पायी प्रवास सुरू केला. तर, कोंडी ओलांडल्यानंतर दुचाकींना हात करून विमानतळाकडे प्रवाशांनी धाव घेतली. पाऊस पडला की विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असून, त्याचा नागरिकांना फटका बसत आहे. पण, त्याकडे यंत्रणांचे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, शहरात पावसानंतर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. पुणे विमानतळाच्या परिसरात पावसानंतर वाहतूक कोंडी नागरिक अडकत आहेत. त्यामुळे प्रवाशांनी किमान साडेतीन तास आधीच घरातून निघावे, असे आवाहन विमानतळ प्रशासनाने केले आहे.