Pune News : संत तुकोबांच्या वारीमध्ये समतेचीही दिंडी, संविधान समता दिंडीचा अनोखा उपक्रम

रहीम शेख, पुणे : आषाढी एकादशीनिमित्त संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी पंढरपूरसाठी मार्गस्थ झाल्या आहेत. या वारीमध्ये खास समतेची दींडीदेखील संत तुकोबांच्या वारीमध्ये सहभागी झाली आहे. संविधान ज्याची सुरुवात आपण भारताचे लोक म्हणजे इथला प्रत्येक नागरिक, प्रत्येक व्यक्तीला धरून आहे, ते संविधान या वारकरी परंपरेतून, या वारकरी दिंडीतून सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे, याच उद्देशाने संविधान समता दिंडी महाराष्ट्रभर दरवर्षी काढली जाते.

संविधान समता दिंडी वारीमध्ये दरवर्षी सामील होत असते. या संविधान समता दिंडीमध्ये महाराष्ट्रातील विविध संस्था, संघटना तसंच विविध वारकरी बांधव सामील होत असतात. तुकोबारायांच्या पालखीसह ही दिंडी पुढे पंढरपूरला जाते. त्याची सुरुवात समता भूमी म्हणजेच फुलेवाडा इथून होते. म्हणजेच समता भूमिती संतभूमी असा एकूणच प्रवास आपण यातून केला जातो.

संविधानाची सुरुवात आम्ही भारताचे लोक म्हणून आहे. भारतात इथला प्रत्येक नागरिक एकमेकांना जोडलेला आहे. या देशाचे संविधान बनलं तर संविधानावर या देशातील विविध संस्कृतींचा प्रभाव देखील आहे. संविधानात असणारी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मूल्य संविधानात प्रत्यक्षपणे न येता त्याचा एक संबंध या भारतीय संस्कृतीशी देखील आहे, या संत परंपरांमध्ये आहे.
Pune News : भुशी डॅम दुर्घटनेनंतर पुण्यात आणखी एक दुर्घटना, लेकीच्या डोळ्यादेखत वडील वाहून गेले; राष्ट्रीय खेळाडूचा दुर्देवी अंत
महाराष्ट्राची ओळख आणि महाराष्ट्राची सर्वात मोठी संस्कृती म्हणजे वारकरी परंपरा, संविधानात ज्या मुल्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. ही मूल्य आपल्या या संस्कृतीत संत परंपरेतून पिढीने पिढी पुढे वाढत आली. संविधान असं म्हणतो, की बंधुतेने आपण जोडून राहू, त्याचप्रमाणे ही वारकरी परंपरा, संतांचे अभंग आपल्याला एकमेकांना जोडून ठेवतात.

अनेकांना संविधान हे एका विशिष्ट जातीचं किंवा एक विशिष्ट धर्माचं किंवा आपलं नाही असं देखील वाटतं, परंतु ते आपल्या सर्वांचा आहे आणि या देशात प्रत्येक घटना ही या संविधानाला धरूनच होत असते. या देशाला धरून ठेवणारं एक मोठं पुस्तक, एक मोठी व्यवस्था ती म्हणजे संविधान. त्यामुळे संविधानाची मूल्य आपल्या या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचली पाहिजेत.