वाहतुकीत केलेले बदल
हिंजवडी, वाहतूक विभागाअंतर्गत मंगळवारी (चार जून) पहाटे पाच ते रात्री ११.३० या वेळेत बालेवाडी स्टेडियम मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्ता ‘उत्तम स्वीट चौक’ (पुणेरी स्विट) ते म्हाळुंगे पोलिस चौकीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांकरिता बंद राहील.
पर्यायी मार्ग
१) चांदे-नांदे व म्हाळुंगे गावातून येणारी वाहने उत्तम स्वीट चौकातून (पुणेरी स्विट) उजवीकडे वळून म्हाळुंगे पोलिस चौकी येथून पुढे राधा चौकाकडे व इच्छितस्थळी जातील.
२) राधा चौकातून येणारी वाहने म्हाळुंगे पोलिस चौकी येथे डावीकडे वळून पुढे म्हाळुंगे गाव, चांदे-नांदे व पुढे इच्छित स्थळी जातील.
मंगळवारी (चार जून ) पहाटे पाच ते रात्री ११.३० या वेळेत जड व अवजड वाहनांना म्हाळुंगे गाव ते राधा चौक आणि परतीच्या मार्गावरही प्रवेश बंद राहील.
पर्यायी मार्ग : चांदे-नांदे येथून येणारी अवजड वाहने ‘गोदरेज सर्कल’ येथून डावीकडे वळून माणमार्गे हिंजवडी येथे येऊन इच्छितस्थळी जातील आणि बाणेर रस्ता व राष्ट्रीय महामार्गावरून येणारी अवजड वाहने राधा चौकातून उजवीकडे वळून वाकड नाकामार्गे हिंजवडी व पुढे इच्छित स्थळी जातील.
अशी आहे पार्किंग व्यवस्था
– म्हाळुंगे पोलिस चौकी ते उत्तम स्वीट चौक (पुणेरी स्वीट) यातील रस्ता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी येणाऱ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांसाठी राधा चौकातून पुढे डाव्या बाजूला खंडोबा मंदिराच्या पाठिमागील मोकळ्या जागेत पार्किंगकरिता व्यवस्था केली आहे.
– ऑर्किड हॉटेल महामार्ग प्रवेशद्वारापासून सुरू होणारा सेवारस्ता मुळा नदी पुलापर्यंत रहदारीसाठी बंद ठेवला असून, हा रस्ता महायुतीच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी राखीव ठेवला आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांसाठी पार्किंगची व्यवस्था त्या सेवारस्त्यावर केली आहे.
– इतर पक्षाचे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते यांच्यासाठी माध्यमिक विद्यालय म्हाळुंगे या शाळेत पार्किंगची व्यवस्था केली आहे.