पुणे: शिक्षणाच्या माहेरघरात ड्रग्जचं रॅकेट थांबता थांबत नाहीये. ललित पाटील प्रकरणात ड्रग्ज केस संदर्भात मोठ्या कारवाया होऊन सुद्धा पुण्यात ड्रग्ज सहजपणे उपलब्ध होत आहे. पुण्यातल्या फर्ग्युसन रोडवरचा एक व्हिडिओ व्हयरल झाल्यानंतर पुण्यासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. फर्ग्युसन रोडवरच्या = L3 (liquor, leisure, lounge) या पबमधील तीन मुलं स्वच्छता गृहात ड्रग्जचं सेवन करताना आणि लेट नाईट पार्टी करताना दिसून आले.
या प्रकरणात आता पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आली आहे. पुणे पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. काल तात्काळ प्राथमिक कारवाई करताना पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी दोन अमलदारांचं निलंब केलं होतं. एकूण चार पोलिसांचं निलंबन एका व्हिडिओमुळे झालं आहे.
शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे गुन्हा पोलीस निरीक्षक अनिल माने, आणि सहायक पोलोस निरीक्ष दिनेश पाटील यांच निलंबन करण्यात आलं आहे. यांच्या सह दोन पोलीस अंमलदार यांचं देखील निलंबन करण्यात आलं आहे. सोबत पब चालक मालक, संतोष विठ्ठल कामठे, सचिन विठलं कामठे, उत्कर्ष कालिदास देशमाने, योगेंद्र गिरासे, देवी माहेश्वरी, अक्षय दत्तात्रय कामठे, दिनेश मानकर, मोहन राजू गायवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर पोलिसानी पबमधील डिव्हीआर, साऊंड, लाइस्ट, टीव्ही, पबमधील सगळं साहित्य ताब्यात घेणतात आलं आहे. तर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पबमधील प्रकाराची चौकशी सुरू आहे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने पब सील केलं आहे.