पुणे दर्शन आता गारगार प्रवासात, दहा विशेष गाड्यांमुळे उन्हाळ्यात पर्यटनचा मस्त आनंद

Pune Tourism: उन्हाळी सुट्यामध्ये पुणे शहरात फिरण्याची अनेकांची इच्छा असते. पण शहर आणि परिसरातील पर्यटनस्थळांची माहितीच नसते. मग पर्यटन कसे फिरायचे? असा प्रश्न अनेकांना पडतो. परंतु आता चिंता करण्याची गरज नाही. पुणे आणि परिसरातील पर्यटनस्थळे फिरण्यासाठी पीएमपीकडून विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. विकेंड आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी तब्बल दहा बसगाड्या शहरातील पर्यटनस्थळे दाखविण्यासाठी धावणार आहेत. सोबत गाईडसुद्धा असणार आहे.

पीएमपीकडून विकेंडला पर्यटनासाठी दहा मार्गावर पीएमपीकडून आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी, रविवारी आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी स्मार्ट वातानुकूलित इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून दिल्या जातात. प्रत्येकी ५०० रुपये तिकीट दर आहे. या बसमध्ये गाइडचीही नेमणूक केलेली असणार आहे.

येथे करा बुकिंग, ग्रुप बुकिंगला सवलत

डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक, निगडी, मनपा भवन या पास केंद्रांवर या विशेष पर्यटन बसचे बुकींग करता येणार आहे. बसच्या आसनक्षमतेनुसार पूर्ण ३३ प्रवाशांचे ग्रुप तिकीट बुकीग काढल्यास पाच प्रवाशांच्या तिकिटात १०० टक्के सवलत मिळणार आहे. तसेच या पास केंद्रांवर बुकींगची वेळ सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत आहे. यासोबतच बुकिंग केलेल्या व्यक्तीला प्रवासाच्या दिवशी राहत्या घरापासून बस सुटण्याच्या ठिकाणापर्यंत जाण्या-येण्यासाठी सदर तिकिटावर अन्य मार्गावरील बसने प्रवास करण्यास मुभा राहील.

अशा धावतात दहा बस आणि त्यांचे मार्ग…

  1. हडपसर, स्वारगेट, इस्कॉन मंदिर, कोंढवा, श्रीक्षेत्र कानिफनाथ गड, मोरगाव गणपती दर्शन, जेजुरीदर्शन, सासवड, स्वारगेट, हडपसर
  2. हडपसर, स्वारगेट, सासवड, सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर एकमुखी दत्त मंदिर, नारायणेश्वर मंदिर, श्रीक्षेत्र म्हस्कोबा मंदिर, कोडीत, सासवड, स्वारगेट, हडपसर
  3. पुणे स्टेशन, डेक्कन जिमखाना, स्वारगेट, शिवसृष्टी, आंबेगाव, स्वामी नारायण मंदिर, नव्हे, कोंढणपूर, तुकाईमाता मंदिर, बनेश्वर मंदिर, अभयअरण्य, बालाजी मंदिर, केतकावळे, स्वारगेट
  4. पुणे स्टेशन, डेक्कन जिमखाना, पु. ल. देशपांडे गार्डन, खारावडे म्हसोबा देवस्थान, निळकंठेश्वर पायथा, झपुर्झा संग्रहालय, घोटावडे फाटामार्गे डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन
  5. पुणे स्टेशन, डेक्कन जिमखाना, सिंहगड रोडने खडकवासला धरण, सिंहगड पायथा, गोकूळ फ्लॉवर पार्क, गोळेवाडी, पानशेत धरण, डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन
  6. पुणे स्टेशन, स्वारगेट, हडपसर, रामदा, थेऊर गणपती, प्रयागधाम, हडपसर, स्वारगेट, पुणे स्टेशन
  7. पुणे स्टेशन, स्वारगेट, वाघेश्वर मंदिर वाघोली, वाडेबोल्हाई मंदिर, तुळापूर, त्रिवेणी संगम, छत्रपती संभाजी महाराज समाधी वढू बु., रांजणगाव गणपती मंदिर, भीमा कोरेगाव विजयस्तंभ, पुणे स्टेशन
  8. पुणे स्टेशन, स्वारगेट, इस्कॉन मंदिर, रावेत, मोरया गोसावी मंदिर चिंचवड, प्रतिशिर्डी, शिरगाव, देहूगाव गाथा मंदिर, भंडारदरा डोंगर पायथा, स्वारगेट, पुणे स्टेशन
  9. स्वारगेट, पौडगाव, सत्य साईबाबा महाराज आश्रम हाडशी (कमान), चिन्मय विभूती योगसाधना ध्यान केंद्र, कोळवण, स्वारगेट
  10. स्वारगेट, भोसरी, चाकण, कांतिवीर हुतात्मा राजगुरू स्मारक, सिद्धेश्वर मंदिर, राजगुरुनगर श्रीक्षेत्र खंडोबा मंदिर निमगाव
(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)