Pune Crime News: चारित्र्याच्या संशयातून उच्चशिक्षित पतीनं पाहा पत्नीसोबत काय केलं; आधी इलेक्ट्रिक शॉक, मग…

पुणे (प्रशांत श्रीमंदिलकर): नवरा बायकोच्या भांडणाचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. त्यातच शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेचा गळा आवळून आणि इलेक्ट्रिक शॉक देऊन तिचा खून केल्याची घडली होती. याबाबत या महिलेच्या नवऱ्याने पोलिसात फिर्याद दिली होती. मात्र आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बायकोवर सतत संशय घेत असल्याने सततच्या वादातून नवऱ्याने पत्नीचा गळा वळून नंतर तिला करंट देऊन तिचा खून केला असल्याचे समोर आले आहे.

शितल स्वप्निल रणपिसे(वय 23)असे खून झालेल्या महिलेचे नाव असून स्वप्निल शामराव रणपिसे खून केलेल्या पतीचे नाव आहे. सततचा वाद त्यातून हिणवणे या गोष्टीला वैतागून पतीने स्वतःच्या पत्नीचा काटा काढल्याचे समोर आले आहे.

आरोपी स्वप्नील उच्चशिक्षित आहे. सात महिन्यांपूर्वी स्वप्नीलचा शीतलशी विवाह झाला होता. तीन जुलैच्या दिवशी स्वप्नील त्याचे वडील शामराव आणि आई शारदा कामानिमित्त बाहेर गेले होते. स्वप्नीलच्या आईचे रांजणगाव सांडस येथे साडीचे दुकान आहे. काम आटोपून दुपारी दोनच्या सुमारास स्वप्नील घरी आला. तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. त्याने शीतलच्या मोबाइलवर संपर्क साधला. मात्र, तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याने चुलतभावाला बोलावून घेतले. दोघे जण घराच्या पाठीमागील दरवाजाने आत गेले. तेव्हा शीतल घरात बेशुद्धावस्थेत आढळून आली. तिच्या गळ्याजवळ दोरी गुंडाळली होती. तसेच, इलेक्ट्रिक शॉक दिल्याचे दिसून आले. दोघांनी शीतलला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी स्वप्नीलने शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

स्वप्नीलच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरट्यांनी शीतलचा खून केला असण्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती. ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने घराच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले होते. सर्व शक्यता गृहित धरून पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी त्याची चौकशी सुरु केली. उच्चशिक्षित असलेला स्वप्नीलने पोलिसांना माहिती दिली. मात्र, माहितीतील विसंगती आणि सीसीटीव्ही फुटेज यावरून स्वप्नीलवरील संशय बळावला होता. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तेव्हा चारित्र्याच्या संशयातून त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली, अशी माहिती पंकज देशमुख यांनी दिली.

Neelam Gorhe: विधानपरिषदेत शाब्दिक संघर्ष; नीलम गोऱ्हे म्हणाल्या, मी तसं काही बोलले असेन तर ते वक्तव्य…
आरोपी स्वप्निल शामराव रणपिसे याचे व पत्नी शितल रणपिसे यांचेत वादविवाद होत होते. स्वप्निल हा वारंवार तिच्या चारीत्र्यावर नेहमी संशय घेत होता. तिचे मागच्या आयुष्याबाबत तिला वारंवार विचारणा करत होता. त्यातून त्याचे नेहमी वाद होत होते. चारीत्र्याचे संशयामुळे स्वप्नीलने खून केला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. स्वप्निल याला 10 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

आरोपी स्वप्निल रणपिसे याचे लग्न होण्यापूर्वी अनेक मुलींना त्यांचे गतआयुष्याबाबत विचारणा करत असे. या कारणावरून बऱ्याच मुलींनी लग्न करण्यास नकार दिला होता. आरोपी स्वप्निल रणपिसे याचा स्वभाव संशयी व चारित्र्यावर संशय घेणारा असल्याने त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला व तिचा खून केला आहे.