तपासादरम्यान सापडले
२८ एप्रिल २०२४ रोजी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी झाली होती. त्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत असताना तीन मे २०२४ रोजी सायंकाळी ७.३०च्या सुमारास दोघे आरोपी वडगाव येथील तुकाईनगर सर्कल येथे थांबले असल्याची माहिती तपास पथकातील पोलिसांना मिळाली.
सापळा लावून घेतले ताब्यात
मिळालेल्या माहितीवरून सिंहगड रस्ता पोलिसांच्या तपास पथकाने संबंधित ठिकाणी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची प्राथमिक चौकशी केली असता, त्यांनी सिंहगड रस्ता परिसरात घरफोडी केल्याचे कबूल केले. निवंगुणे आणि मरडे यांना अटक करून अधिक तपास केला.
माल, दुचाकी जप्त
आरोपांनी घरफोडीतील सोन्याचे दागिने त्यांनी लक्ष्मण अण्णा जाधव (वय ३८, रा. हॅप्पी कॉलनी, कोथरूड) याच्याकडे विक्री केल्याचे सांगितले. या गुन्ह्यात चोरीला गेलेला माल आणि ३० हजार रुपये किमतीची दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार, निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
खबरदारीचे आवाहन
उन्हाळ्यात घर बंद ठेवून पर्यटनासाठी किंवा गावी जाणाऱ्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, मौल्यवान वस्तू घरी न ठेवता बँकेतील लॉकरमध्ये ठेवावेत. बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना त्याची कल्पना द्यावी. घराच्या परिसरात सीसीटीव्ही लावावेत, अशी खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.