प्रतिनिधी पुणे : तरुणी घरात एकटी असताना दोन अनोळखी व्यक्तींनी तरुणीला मारहाण केली आणि तिच्या घरावर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. तरुणीच्या घरातील एक लाख ६८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.
पुण्याच्या कोंढवा बुद्रुक येथील अश्रफनगरमधील गुरुकृपा हाईट्स या सोसायटीत ही संतापजनक घटना घडली आहे. दोन जुलैला दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी २३ वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरुन दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी विवाहित आहे. ती कुटुंबीयांसोबत अश्रफनगर येथे राहते. तक्रारदार तरुणीचा पती खासगी कंपनीत नोकरीस आहे. हा प्रकार घडला त्यादिवशी ते कामाला गेले होते. तर, ६१ वर्षीय सासरे आणि लहान मुलगा बाहेर गेले होते. तरुणी घरात एकटीच होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती या तरुणीच्या दारावर काहीतरी पार्सल घेऊन उभे राहिले होते. तिने दरवाजा उघडून दोघांकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनी सांगितले की, ‘शाहरुख भाईचे पार्सल आहे. त्यांचा फोन लागत नाही. तुम्ही त्यांना फोन लावा.’
तरुणीने त्यांचं ऐकून बेडरूममध्ये मोबाइल आणण्यासाठी गेली. याचा फायदा घेत दोघे जण घरात घुसले. त्यांनी घराचा दरवाजा आणि खिडक्या बंद केल्या. तर डाव साधत तरुणीला मारहाण केली. तरुणीने आरडा-ओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. एका आरोपीने तरुणीचे डोके भिंतीवर आपटले. तर, दुसऱ्याने तिचा गळा आवळला आणि नाकही दाबले. त्यामुळे तरुणी जागेवरच बेशुद्ध झाली. त्यानंतर दहा मिनिटातच तरुणीचे सासरे घरी आले, त्यांनी तिला शुद्धीत आणले. तेव्हा घरातील सामानांची उलथापालथ झाल्याचे त्यांना दिसले. कपाटातील मुद्देमाल तपासला असता, चोरट्यांनी डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले. याविरोधात तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या चोरट्यांविरोधात गु्न्हा दाखल केला आहे. तर पुढील तपास करत आहेत.