Pune Crime: बारामतीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, तलाठ्यासाठी लाच घेणारा जाळ्यात

पुणे (बारामती) : पुण्यातील बारामतीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसील कार्यालयाच्या परिसरात धडाकेबाज कारवाई केली. लावलेल्या सापळ्यात तीन हजार रुपयांची लाच तलाठ्यासाठी स्वीकारताना चंद्रकांत पर्वत जावळकर या खासगी इसमाला रंगेहाथ पकडले. वारस नोंदीसाठी तलाठी पैसे मागतात त्याची फक्त चर्चा होती. मात्र, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने तलाठी कार्यालयांमधून बारामती तालुक्यात देखील सरकारी काम करण्यासाठी लाच मागितली असल्याचे उघड झाले आहे.तक्रारदाराच्या सासऱ्याच्या नावावरील कसबा बारामती येथील जागेवर तक्रारदाराच्या पत्नीची वारस म्हणून नोंद लावण्यासाठी तक्रारदाराने बारामतीच्या तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. ही नोंद लावण्यासाठी खासगी इसम चंद्रकांत जावळकर याने तलाठ्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणी केली होती, अशी तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
Vinod Tawde : भाजप ३४०, महायुती ४०८; विनोद तावडे ‘अब की बार, चारसौ पार’ वर ठाम, ठाकरे-पवारांवरही टीका

यावरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पंचांसमक्ष या तक्रारीची पडताळणी केली. तेव्हा खासगी एजंट चंद्रकांत जावळकर याने बारामतीच्या तलाठ्यासाठी तक्रारदाराकडे पत्नीची वारस नोंद करण्यासाठी पंचायत समक्ष तडजोड करून चार हजार रुपयांची लाच मागितली आणि तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांची प्रत्यक्ष लाच घेताना चंद्रकांत जावळकर याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे. दरम्यान ज्या तलाठ्यासाठी या जावळकर याने ही लाच मागितली तो तलाठी कोण त्याची चर्चा सुरू झाली आहे.