संतराम घुमटकर, बारामती : बारामती उपविभागात गेल्या तीन वर्षांत ३० दरोड्यांचा तपास करून २३७ आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. बारामती, इंदापूर या तालुक्यांतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उपविभागीय पोलिस प्रशासन प्रयत्नशील असले, तरी वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाले आहेत. पत्नी-पत्नीचे भांडण, भाऊबंदकीतून वाद या माध्यमांतून गुन्हेगारी डोके वर काढत आहे.ऐन उन्हाळ्यात दरोडेखोर सक्रिय होतात. आतापर्यंत ३१ ठिकाणी दरोडे पडले आहेत. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी ३० घटनांची उकल करून आरोपींना अटक केली आहे. उपविभागातील पाच अट्टल दरोडेखोरांच्या शेऱ्या टोळीवर ‘मकोकां’तर्गत कारवाई करण्यात आली आहे. बारामतीमधील तावरे टोळी गजांआड आहे. परिसरातील दरोडेखोरांवर ‘मकोका’ अंतर्गत आणि तडीपारीची कारवाई केल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
उपविभागातील दरोडे
वर्ष दाखल गुन्हे उघड गुन्हे
२०२१ ९ ९
२०२२ १० १०
२०२३ ११ १०
२०२४ १ १
एकूण ३१ ३०
दरोडे, चोऱ्या रोखण्यासाठी गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. दरोड्याच्या गुन्ह्यातील अनेक आरोपींवर पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मकोका’ कारवाई करण्यात येणार आहे.
– सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती
दरोडे रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिकांच्या मदतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संसाधनाचा वापर करून या गुन्ह्यांवर शंभर टक्के नियंत्रण मिळविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
– संजय जाधव, अप्पर पोलिस अधीक्षक, बारामती