Pune Bus Rape Case: पुणे बस केस प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठं यश लागलं आहे. ‘शिवशाही’ बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या 37 वर्षीय दत्तात्रय रामदास गाडे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दत्तात्रय याच्यावर 26 वर्षीय तरुणीचा बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला त्याच्या गावातून अटक केली. पोलिसांनी ज्याठिकाणी शोध मेहिम सुरु केली होती, त्या ठिकाणी आरोपी नव्हता. पण जेव्हा पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईकांची चौकशी केली तेव्हा आरोपी गावातच असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर दत्तात्रय शेतात सापडला. पण त्याआधी पोलिसांनी दुसऱ्याच गाडेला ताब्यात घेतलं. जो हुबेहूब आरोपी दत्तात्रय गाडे सारखा दिसत होता.
दरम्यान, माहिती मिळताच पोलिसांचं पथक तातडीने आरोपीच्या गावी शिरूर येथे पोहोचलं. पोलिसांकडे आरोपीचा फोटो होता. पोलिसांनी आरोपीसारख्या दिसणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांना वाटलं की त्यांना दत्ता सापडला आहे. म्हणून पोलिसांनी मोकळा श्वास देखील घेतला. पण नंतर असं काही झालं, ज्यावर पोलिसांचा देखील विश्वास बसला नाही.
15 ते 20 मिनिटांनंतर पोलिसांना कळलं की, हा आरोपी नसून त्याचा भाऊ आहे. जो हुबेहूब आरोपीसारखा दिसतो. जेव्हा पोलिसांनी आरोपीच्या घरावर धाड टाकली. तेव्हा आरोपीचा भाऊ घरात होता. दत्तात्रय याच्या भावाला पाहून पोलीस देखील हैराण झाले. तेव्हा आरोपीचा भाऊ पोलिसांना म्हणाला, ‘मी दत्ता नाही त्याचा भाऊ आहे. दत्ता माझ्यासारखा दिसतो. तुम्ही दत्ताला शोधत आहात का?’ असा प्रश्न दत्तत्रय याच्या भावाने पोलिसांना विचारला… त्यानंतर दत्तात्रय याच्या भावाची पोलिसांनी सुटका केली आणि खऱ्या आरोपीला अटक केली.
आरोपीची करण्याच आली वैद्यकीय तपासणी
आरोपी दत्ता गाडे याला अटक केल्यानंतर त्याची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. रात्री दोन वाजता त्याला पुण्यात आणण्यात आलं. तीन वाजता त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आज दत्तात्रय याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पोलीस ॲक्शन मोडवर
गुरुवारी पोलिसांनी गाडेला ताब्यात घेतलं. त्याला पकडण्यासाठी ड्रोन आणि श्वान पथके तैनात करण्यात आली होती. गाडेला पकडण्यासाठी पोलिसांची 13 पथके तयार करण्यात आली होती .मिळालेल्या माहितीनूसार, आरोपी गाडे याच्यावर यापूर्वी चोरी, दरोडा, चेन स्नॅचिंग यांसारखे गुन्हे दाखल आहेत. 2019 मध्ये एका गुन्ह्यात आरोपीची जामिनावर सुटका झाली होती.