Pune Accident: पुण्यात १४ वर्षांच्या मुलाने टँकर दामटवला, पादचाऱ्यांना उडवलं, अनेक जण जखमी

पुणे वानवडी टँकर अपघातपुणे : पुण्यात दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळत आहे. पोर्शे कार अपघातनंतर आता आणखी एक काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर आली आहे. एका १४ वर्षांच्या मुलाने टँकर चालवून रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीला धडक दिली आहे. या धडकेत महिला जखमी झाली आहे. अल्पवयीन मुलाने हा टँकर चालवला असल्याची माहिती समोर आली आहे.

व्यायाम करण्यासाठी निघालेल्या मुलांना धडक

पुण्यातील वानवडी परिसरत हा अपघात घडला असून यात व्यायाम करण्यासाठी निघालेल्या मुलांना देखील उडवाल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळच्या सुमारास हा अपघात घडला आहे. अपघातनंतर स्थानिक नागरिकांनी टँकर चालकाला अडवून पकडून ठेवले. तेव्हा तो अवघ्या १४ वर्षांचा अल्पवयीन मुलगा असल्याचे समोर आले आहे.
Delhi Rain: पावसाने दिल्लीची दाणादाण! दुर्घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू, रस्त्यांवर पूरसदृश स्थिती

दुचाकीला टॅंकरची धडक

मिळालेल्या माहितीनुसार, वाणवडी परिसरातून व्यायामासाठी काही मुली आणि दुचाकीवर एक महिला जात होती. त्यावेळी वेगात आलेल्या एका टँकरने दुचाकीला जोरात धडक दिली. दुचाकीवरील महिला धडकेनंतर रस्त्यावर पडली. तर टँकरची धडक काही मुलींना देखील बसली. त्यावेळी महापालिकेचे कर्मचारी संतोष ढुमे आणि त्यांच्या पत्नी तिथून जात होत्या. त्यांनी टँकरखाली अडकल्या मुलींना बाहेर काढले.

टॅंकर चालक अल्पवयीन

या अपघाताने पुण्यात खळबळ उडाली आहे. अवघ्या १४ वर्षांच्या मुलाने टँकर चालवून हा अपघात केला आहे. स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधामुळे त्या अल्पवयीन मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील कारवाई वानवडी पोलीस करत आहेत. या घटनेनं पुण्यात दिवसेंदिवस अपघातांची मालिका वाढू लागली आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या वाहन चालवण्याबाबत कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.