उन्हाळ्यात चेहऱ्यावर गुलाबी चमक मिळवण्यासाठी बीटापासुन तयार करा ‘हा’ पावरफुल फेसपॅक

Beetroot remedies to get natural pink glow in summerImage Credit source: tv9 marathi

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणाच्या आर्द्रतेमुळे तसेच जास्‍त घाम येत राहणे यामुळे आपल्याला त्वचेच्या समस्या उद्भवतात जसे की मुरुमे, ब्लॅकहेड्स, त्वचा फ्रेश न दिसणे इत्यादी, तर कडक उन्हात बाहेर पडल्याने टॅनिंग, रॅशेस इत्यादी समस्या देखील उद्भवतात. यामुळे चेहरा निस्तेज होतो आणि चमक नाहीशी होते. चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी अनेक गोष्टी वापरल्या जातात, पण तुम्हाला माहिती आहे का की बीट तुमचे आरोग्य चांगले ठेवू शकत नाही तर तुमच्या चेहऱ्यावर गुलाबी चमक आणू शकते आणि त्वचेच्या अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता, फक्त तुम्हाला ते योग्य पद्धतीने लावावे लागेल.

बीट हे व्हिटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत आहे, त्यामुळे ते त्वचेचा रंग उजळवते आणि टॅनिंग दूर करण्यास देखील उपयुक्त आहे. याशिवाय, बीटच्या वापराने आपल्या त्वचेवरील सुरकुत्या, रंगद्रव्य, काळी वर्तुळे कमी करण्यास आणि त्वचेला समतोल करण्यास मदत करते. या लेखात आपण स्किन केअरसाठी बीटाचा कशा पद्धतीने वापर करू शकतो ते जाणून घेऊयात…

बीटाचा फेस मास्क

सर्वप्रथम बीट धुवून सोलून घ्या आणि नंतर त्याचा रस काढा किंवा बीटाची पेस्ट बनवा. त्यात गुलाबजल मिक्स करून त्यात थोडे ग्लिसरीन आणि कोरफड जेल टाका. आता हा पॅक चेहऱ्यावर लावण्यासाठी तयार झालेला आहे. तर तुम्ही हा पॅक डोळ्यांखालील भागावर आणि संपूर्ण चेहऱ्यावर मानेपर्यंत लावा. यानंतर 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्या. हलक्या हाताने मालिश करून ते स्वच्छ करा. तुमच्या पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला आश्चर्यकारक परिणाम दिसतील.

टॅनिंगपासून मुक्तता मिळेल

बीट सोलून बारीक करून पेस्ट बनवा आणि त्यात दही घाला. यासोबतच लिंबाच्या रसाचे काही थेंबही त्यात मिक्स करा. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा ते वापरता येते. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील टॅनिंग हळूहळू कमी होताना दिसेल.

बीटपासून टोनर बनवा

बीटाचा रस काढा आणि त्यात समान प्रमाणात गुलाबजल घाला. त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करा आणि ते स्प्रे बाटलीत भरा आणि झोपण्यापूर्वी टोनरप्रमाणे चेहऱ्यावर लावा. यामुळे पिंपल्स कमी होतील आणि तुमच्या चेहऱ्यावर गुलाबी चमक येईल. तुम्ही बीटचे तुकडे करून ते थेट तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता, ज्यामुळे तुम्हाला खूप फायदे मिळतात.

बीटाचे त्वचेसाठी हे फायदे आहेत

चेहऱ्यावर बीट लावल्याने त्वचेच्या पेशी निरोगी राहतात आणि त्वचेची लवचिकता देखील वाढते, ज्यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा येण्यापासून बचाव होतो. याशिवाय, बीट चेहऱ्याचा रंग वाढवते आणि नैसर्गिक चमक देते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)