“मागच्या तारखेला लेखी स्वरूपात सगळ देण्यात आलं होतं. त्यावेळी एक मुद्दा आम्ही मांडला होता की पोलिस आयुक्त पुणे शहर आणि ग्रामीण पोलिस अधिक्षकांचे वर्जन वेगळे आहेत. ग्रामीण पोलीस भिडे आणि एकबोटे यांच्यावर इशारा करत होते तर पुणे पोलिस नक्षलवादी यांच्याकडे बोट करत आहेत. तिसरा अँगल शरद पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या बाबतीत एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात पवारांनी राईट विंग वरती आरोप केले होते” असं प्रकाश आंबेडकर कोरेगाव भीमा सुनावणीबाबत म्हणाले.
“कमिशन समोर त्याबाबतही कुठलीच कागदपत्रे न्हवती. त्या संदर्भातील सगळी कागदपत्रे मी सादर केले आहेत. हे पत्र पवारांनी ठाकरेंना लिहिलं होतं. आयोगाने पत्र स्वीकारले आहे. पुन्हा सुनावणी आयोगासमोर होणार आहे. पुढील सुनावणीत पवारांची साक्ष घेणे गरजचे आहे का, हे तपासणार आहेत. गरज पडली तर पवारांना बोलणार असे आयोगाने सांगितलं आहे. तीन अँगल आहेत ते तिन्ही तपासणार आहेत. पत्रात अनेक उजव्या संघटनेची नावे आहेत” असं प्रकाश आंबेडकर कोरेगाव भीमा सुनावणीबाबत बोलताना म्हणाले.
‘आता भाजपने धस यांनाच संपवलं’
“देशमुख कुटुंब मला भेटायला आलं होतं, तेव्हा मी विचारलं होतं की तुम्ही FIR दाखल केला आहे का? तर त्यांनी तो न्हवता केला. मग नंतर त्यांनी FIR दाखल केला. ज्यांनी आंदोलन केलं, त्यांनी ही केस DIREL करण्याचा प्रयत्न केला आहे. FIR मधील संशयित आरोपींची नावे पुढे आल्याशिवाय घेता येत नाहीत. कुटुंबाचा FIR महत्वाचा आहे. जरांगे यांना कंट्रोल करण्यासाठी धस यांना पुढे करण्यात आलं आणि आता भाजपने धस यांनाच संपवलं. आरोप सिद्ध झाले तर मुंडेंनी राजीनामा दिला तर योग्य, दमानिया यांनी कोर्टात पुरावे सादर करावे” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
‘सरकारला मिस लीड केलं आहे’
“मुख्यमंत्र्यांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यायलाच हवा. कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. आमदारकी सुद्धा ठेवता येत नाही. सरकारला मिस लीड केलं आहे. कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं. कोर्टाने कोकाटे यांना दोषी ठरवलं आहे. म्हणून कारवाई झाली पाहिजे” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.