आरक्षणावर सामजस्यांने तोडगा काढायचा असेल तर राज्यातील एनसीपी शरद पवार गट, एनसीपी अजित पवार गट, काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट यांनी बसून योग्य ती भूमिका घेतली पाहिजे आरक्षणावर तोपर्यंत तोडगा निघणार नाही असे मत प्रकाश आंबेडकरांनी मांडले आहे. मुख्यमंत्री शिंदेंना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनंती करण्यात आली होती की सर्व राजकीय पक्षांना पत्र लिहावे की मराठा आरक्षणावर मनोज जरांगेंची मागण्यांवर राजकीय पक्षांची भूमिका काय आहे, पण अद्याप आम्हाला तरी पत्र मिळाले नाही अशी माहिती आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
जरांगे पाटील यांचे आंदोलन गरीब मराठ्यांचे आहे, मात्र त्यांना प्रतिनिधी नाही त्यांचं आंदोलन कुठं जाईल त्याची दिशा मला कळत नाही आहे सध्या असे आंबेडकर म्हणाले, गरीब मराठ्यांना विनंती आहे, श्रीमंत मराठा तुम्हाला फसवत आले आहे, टिकाऊ आरक्षण दिले जात नाही,तेव्हा ओबीसीच्या हातात सत्ता द्या, सत्तेचा उपयोग होईल तुम्हाला आरक्षण मिळेल, गरीब मराठ्यांना आरक्षण मिळेल, स्फोटक परिस्थिती चिघळू नये,,शांतता राहायला हवी,ओबीसी संघटना आणि वंचित आघाडी याची भूमिका स्पष्ट आहे असे आंबेडकर म्हणाले.
ओबीसी संघटना मागणी होती वंचितने ओबीसींची भूमिका सगळीकडे घेवून जावे, म्हणून सगळ्या संघटनांना घेऊन आम्ही २५ तारखेला दादर चैत्यभूमी इथून आरक्षण बचाव यात्रा सुरु करणार आहोत, याच दिवशी फुले वाडा पुणे आणि 26 जुलैच्या सकाळी शाहू महाराजांनी आरक्षणाची घोषणा केली होती त्यांच्या कोल्हापुरात नतमस्तक होऊन आरक्षण बचाव जण यात्रा आम्ही काढणार आहोत तर कार्यक्रमाची सांगता छत्रपती संभाजीनगरमध्ये होईल अशी माहिती आंबेडकरांनी दिली.