Pooja Khedkar : ‘आरोप केलेत सिद्ध नाही झालेत’ पूजा खेडकर यांचे पत्रकारांना उत्तर

मुंबई : मागील एक आठवड्यापासून पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. वाशिममध्ये ट्रेनी आयएसएस म्हणून कार्यरत असणाऱ्या पूजा खेडकर प्रकरणात नवी माहिती समोर येत आहे. आज सकाळपासून पूजा खेडकर यांचे कुटुंब गायब असल्याची माहिती माध्यमांवर झळकत होती अशातच आता पूजा खेडकर यांचे सर्व प्रकरणावर माध्यमांसमोर प्रतिक्रिया आली आहे. पूजा खेडकर यांनी माध्यामांना थेट उत्तर देत सगळ्याच आरोपांवर बोलणे केले आहे.

पूजा खेडकर यांच्या आईवडिलांचा पोलीस सकाळपासून शोध घेत आहेत अशातच केंद्र सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या समिती समोर पूजा खेडकर आज चौकशीसाठी गेल्या होत्या. ट्रेनी म्हणून रुजू झालेल्या पूजा अरेरावी आणि गैरवर्तनामुळे अडचणीत आल्या होत्या, पण आता रोज नवनवे खुलासे होत असल्याने पूजा यांच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. आज झालेल्या चौकशीत पूजा यांनी काय उत्तरे दिली समितीत त्यांना काय प्रश्न विचारले असे पत्रकारांकडून सवाल करण्यात आले.
IAS Pooja Khedkar : हातात बंदूक घेत धमकी, सोबत बाउन्सर; पूजा खेडकर यांच्या आईचा व्हिडिओ व्हायरल

पूजा खेडकर यांनी उत्तर देताना आपण मिडीयासमोर उत्तर देण्यासाठी बांधील नाही असे म्हणत मिडीयाला टाळणे पसंत केले पण पत्रकारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे अखेर पूजा खेडकर यांनी उत्तर द्याला सुरुवात केली. माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे अजून तरी फक्त आरोप आहेत,मात्र ,भारताची संविधानिक अधिकार दिलाय की जोपर्यंत एखाद्यावर आरोप केला जात आणि ते आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत ते आरोपी होत नाहीत असं पूजा खेडकर यांनी माध्यमांना बोलताना दिला आहे.

पूजा खेडकर यांना कोण करते टार्गेट ?

पूजा खेडकर पुढे म्हणाल्या कुणी काही जरी आरोप केले तरी मात्र त्याचं उत्तर मी नेमलेल्या कमिटी समोर मी सादर करणार आहे. ते दाखल करण्यात आलेले दस्तावेज असतील किंवा सर्टिफिकेट असतील मी ते कमिटी समोर मांडणार आहे असे पूजा म्हणाल्या. यावर पुढे बोलताना पूजा यांना तुम्हाला कोणी टार्गेट करते का? असा सवाल करण्यात आला यावर सर्वसामान्य जनतेला माहित आहे प्रशासन कसं चालते आणि सगळे काम कशी होतात, म्हणून मी माझं म्हणणं जनतेसमोर आणि मिडियासमोर मांडते पुढे जे होईल ते तुम्हाला कळलेच अशी पूजा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.