Pooja Khedkar : आयएएस पूजा खेडकर अपात्र ठरणार? प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याचे नियम काय सांगतात? जाणून घ्या सविस्तर

मुंबई : पूजा खेडकर यांचं आयएएस पद वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं आहे. पूजा खेडकर या 2022 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाल्या. त्यात त्यांनी 821 वी रॅंक मिळवली. परंतु आता त्यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या कोट्यामधून त्याची नियुक्ती करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांची सुरवातीला प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून पुण्यात नियुक्ती करण्यात आली होती. परंतु काही वादांमुळे त्यांची पुन्हा वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. याच निमित्ताने आपण प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यासाठी काय नियम असतात? त्यांचं निलंबन होऊ शकतं का? हे जाणून घेऊ

प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यासाठी कोणते नियम असतात ?

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाल्यानंतर अधिकाऱ्यांना मसुरीतील लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन येथे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाचा कालावधी किमान 2 वर्षांचा असतो. दोन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची अंतिम परीक्षा होते. त्यानंतर अधिकाऱ्याकडे मुख्य पदभार दिला जातो. प्रशिक्षण कालावधीत अधिकाऱ्यांना पगार आणि प्रवास भत्ते दिले जातात. परंतु आयएएस अधिकाऱ्यासारख्या बाकीच्या सोयी मिळत नाहीत. जसे की,अधिकृत निवासस्थान,अधिकृत कार,अधिकृत कक्ष इत्यादी.
रत्नागिरीचं जोडपं माथेरानला फिरायला, हॉटेलमधून अचानक बेपत्ता; दरीत मृतदेह सापडले, काय घडलं?

तर अधिकाऱ्याला अपात्र ठरवले जाऊ शकते

प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याला अपात्र ठरवण्याचा अधिकार केंद्रीय लोकसेवा आयोगाला आहे. जर प्रशिक्षणार्थी अधिकारी आपल्या अभ्यासाकडे किंवा कर्तव्यांकडे दुर्लक्ष करत असेल तर त्याला अपात्र ठवण्याचा अधिकार आयोगाला आहे. यांची तरतूद प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या नियमावलीमध्ये करण्यात आली आहे.

पूजा खेडकर अपात्र ठरणार का ?

केंद्रीय लोकसेवा आयोगाने 1995 च्या बॅचपासून नागरी सेवांमध्ये 27 टक्के जागा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर 2006 च्या बॅचपासून दिव्यांगांसाठी आरक्षण सुरू केलं . त्यानुसार प्रत्येक श्रेणीतील 3 टक्के जागा दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पूजा यांची परीक्षेत 821 वी रॅंक असून देखील त्यांची अपंग प्रवर्गातून नियुक्ती झाली आहे. या मुद्द्यावरूनच सध्या वाद सुरू आहे. जर पूजा यांचे ओबीसी आणि अपंगत्वाचे प्रमाणपत्र अवैध असल्याचे समोर आले तर खेडकर यांना अपात्र ठरवण्याचा अधिकार आयोगाला आहे.