नागपुरातील राड्यानंतर आता पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये; पोलीस आयुक्त स्वत: मैदानात

औरंगजेबच्या कबरीवरून सोमवारी रात्री नागपुरात चांगलाच राडा झाला. दोन गट आमने-सामने आले. दगडफेक झाली, जाळपोळ देखील करण्यात आली. या घटनेत मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान या घटनेनंतर आता नागपुरात अनेक ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आला असून, पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून येत आहे. आज पोलीस आयुक्तांनी ज्या ठिकाणी या राड्याला सुरुवात झाली, त्या घटनास्थळाची पाहाणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.

नागपूर राडा प्रकरणी पोलीस आयुक्तांकडून पाहाणी करण्यात आली आहे ,संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. नागपुरात मोठा राडा झाला होता. दगडफेक, जाळपोळ या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक रश्मी शुल्का यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यानंतर आता पोलीस आयुक्तांकडून शहरात पाहाणी केली जात आहे. नागपुरात अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. आठ ते नऊ ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये इमामवाडा, यशोधरानगरसह आठ ते नऊ ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

ज्या परिसरातून या तणावाला सुरुवात झाली. त्या भागाची पोलीस आयुक्तांकडून पाहाणी करण्यात आली आहे. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली. नागपुरात अनेक ठिकाणी आज संचारबंदी आहे, संचारबंदीचा आढावा घेण्यासाठी आज पोलीस आयुक्तांनी ग्राऊंड लेव्हलवर जाऊन पाहाणी केली , सुरुक्षेचा आढावा घेतला. सोमवारी रात्री जी जाळपोळ झाली, त्यामुळे मोठा राडा झाला होता. या परिसरात आणखी काही इनपूटस् आहेत का याची पाहाणी पोलीस आयुक्तांकडून करण्यात येत आहे. नागपुरात आता शातंता आहे, मात्र अजूनही लोकांच्या मनात भीती आहे. ही भीती दूर करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.

पुन्हा असा काही प्रकार घडू नये, यासाठी आमचे सर्व अधिकारी कर्मचारी प्रयत्न करत आहेत. संचारबंदी लागू आहे, त्याचा आढावा घेण्यासाठीच आम्ही सध्या इथे आलो आहोत. आमची पूर्ण पोलीस फौज शहरात तैनात आहेत, शहरात शांतता आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)