Pune PMPML Bus: पुणे महानगर परिवहन महामंडल लिमिटेड (पीएमपीएमएल) पुणे शहर आणि परिसरात आपली बस सेवा देत आहे. लाखो पुणेकर पीएमपीएमएलच्या बसने प्रवास करतात. पुणेकरांसाठी मेट्रोपूर्वी सार्वजनिक बस सेवेचा पीएमपीएमएल एकमेव मार्ग होता. आता मेट्रो मोजक्या मार्गावर असल्यामुळे शहर बसनेच पुणेकरांचा प्रवास होतो. परंतु पुणेकरांनो बसमध्ये बसणे म्हणजे जीव धोक्यात घालण्याचा प्रकार आहे. कारण पीएमपीएमएलचे चालक मालिकेच्या प्रेमात पडले आहेत. बस चालवताना मोबाईलवर मालिका पाहिली जात आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. बस चालकाने केलेल्या अनोख्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मालिका पाहत चालकाचे ड्रायव्हींग
पुण्यात पीएमपीएमएल ड्रायव्हरचा अनोखा प्रताप समोर आला आहे. पुणेकर ड्रायव्हरने कानात हेडफोन घातला. मोबाईलवर मालिका लावली. आपल्या समोरच्या जागेवर मोबाईल ठेवला. मग आवडती मालिका बघत ड्रायव्हींग सुरु केली. मालिका पाहता पाहता त्याने पुण्यातील वाहतूक कोंडीच्या रस्त्यांवर बस चालवली. त्यामुळे बसने प्रवास करणाऱ्या पुणेकरांच्या जीव धोक्यात आला आहे. ज्या चालकावर विश्वास ठेवत बसमध्ये निर्धास्त प्रवाशी बसले असतील त्यांना या प्रकाराची माहिती नव्हती. परंतु एका प्रवाशाचा लक्षात ड्रायव्हरचा प्रताप आला. त्याने हा प्रकार करणाऱ्या चालकाचा व्हिडिओ काढला. तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पुणेकरांच्या जीव धोक्यात, पुण्यातील PMPML चालक मालिकेच्या प्रेमात, बस चालवताना हेडफोन लावून मालिका पाहिली जात आहे… pic.twitter.com/GZM16WkdYs
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 2, 2025
कारवाई होणार का?
वाहतूक कोंडीच्या शहरात ड्रायव्हरने केलेल्या या प्रकाराची वाहतूक पोलीस आणि पुणे पीएमपीएमएल प्रशासन दखल घेणार की नाही? त्या ड्रायव्हरवर कारवाई होणार का ? असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. पुणे शहरातील वाहतुकीचे अनेक प्रश्न असताना पीएमपीएम चालकच असे प्रकार करत असतील तर पुणेकरांचे काही खरे नाही, अशी प्रतिक्रिया उमटू लागली आहे.
पुणे मनपा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करत आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थींनीसाठी सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय घेतला. परंतु दुसरीकडे बसचालक आपली जबाबदारी विसरत बस चालवत आहे.