प्रतिकात्मक छायाचित्रImage Credit source: Tv9
प्रत्येक आई-वडीलांना वाटते की, आपल्या मुलाने आपले ऐकले पाहिजे. कारण लहान मुलं खुप खोडकर असणे हे स्वाभाविक आहे. पण लहानपणी मुलं खुप चिडचिडे होतात. तसेच जास्त रागावणे आणि त्यांना इतरांना मारण्याची सवय लागते. ही एक सामान्य समस्या असली तरी वेळीच सुधारणे खूप गरजेचे असते. जेव्हा एखादे मूल गर्विष्ठ होते तेव्हा ते घरी येणाऱ्या पाहुण्यांकडेही लक्ष देत नाही. अशी मुले पाहुण्यांना मारहाण करतात आणि त्यांच्याशी वाईट वागतात, ज्यामुळे तुमच्या परस्पर संबंधांवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत मुलांना योग्य दिशा दाखवणे तसेच शिस्त शिकवणे आणि त्यांच्या समस्या समजून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण अशा काही पालकतत्वाच्या टिप्स जाणून घेणार आहोत ज्याच्या मदतीने आपण मुलांना योग्य वळण लागले जाईल.
मुलाला प्रेमाने समजावून सांगणे
तुमच्या घरात जर लहान मुल असेल आणि ते घरातील सदस्यांना मारत असेल तेव्हा त्यांना ओरडू नका. त्यांना प्रेमाने सांगा की मारणे चुकीचे आहे. मुलाने इतरांना मारण्याचे पहिले कारण म्हणजे तो खूप अस्वस्थ असतो. यासाठी त्यांचा राग नीट समजून घ्या.
शिस्त शिकवा
घरात आलेल्या पाहुण्यांना जर तुमचे ओरडत असेल, मारत असेल तर तेव्हा त्याला लगेच समजावून सांगा की हे चुकीचे आहे. त्यांना सर्वांशी कसे वागावे त्याचबरोबर कोणाबद्दल वाईट बोलू नये, प्रत्येकाची मदत करावी. मोठ्यांशी आदराने बोलावे अशा बेसिक आणि आवश्यक शिस्तीचे पालन करायला शिकवा.
नात्यांचा अर्थ समजावून सांगणे
जेव्हा जेव्हा तुमचे मूल कुटूंबातील एखाद्या व्यक्तीला मारते तेव्हा त्याच वेळी त्याला समजावून सांगा की ती व्यक्ती त्याची नात्याने कोण लागते. असे केल्याने तुमच्या मुलाला लगेच समजेल की त्याने कोणती चूक केली आहे.
अभ्यास करण्यास प्रेरित करा
तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सांगावे. तुमचे मूल जितके जास्त अभ्यासात गुंतेल तितकेच त्याला सर्वांसोबत कसे राहायचे हे समजेल.
घरात शांतता राखा
तुमच्या घरात जर चांगले वातावरण असेल तर तुमचे मूलही सर्वांशी शांतपणे आणि हुशारीने वागेल. यासाठी, तुमच्या मुलांना घरातील भांडणाच्या वातावरणापासून दूर ठेवा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)