OYO Hotels : ओयोची ग्राहकांसाठी बंपर ऑफर, एकही रुपया खर्च न करता हॉटेलमध्ये 5 दिवस राहा फ्री, असं करा बुकिंग

ओयो हॉटेल्समध्ये (OYO Hotels) मुक्कामासाठी राहू इच्छिणाऱ्या लोकांसाठी मोठी बातमी आहे. ओयो कंपनीकडून आपल्या ग्राहकांसाठी एक शानदार ऑफर जारी करण्यात आली आहे. ओयोने जारी केलेल्या या नव्या ऑफरमध्ये तुम्हाला पाच दिवस एकही रुपया न खर्च करता हॉटेलमध्ये फ्री राहता येणार आहे. देशभरातली तब्बल 1 हजारांपेक्षा जास्त हॉटेलमध्ये ही ऑफर उपलब्ध आहे.

ओयोने आपल्या ग्राहकांसाठी जारी केलेल्या या नव्या ऑफरनुसार तुम्हाला आता पाच दिवस एकही रुपया न खर्च करता हॉटेलमध्ये फ्री राहता येणार आहे. प्रीमियम, बजेट, टाउनहाऊस अशा जवळपास सर्वच कॅटेगिरीमधील रूमसाठी ओयोने ही खास ऑफर लागू केली आहे. ओयेचे फाउंडर रितेश अग्रवाल यांनी याबाबत एक पोस्ट ट्विट करत ही खास ऑफर आपल्या ग्राहकांसोबत शेअर केली आहे.

‘या वीकेंडला स्पेशल बनवा, आपल्या प्रियजनांसोबत खास क्षणाचा आनंद घ्या. प्रवास करा आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवा, तुमच्या क्षणांना खास बनवा’ असं ट्विट रितेश अग्रवाल यांनी केलं आहे. आता तुम्ही हा विचार करत असाल की ओयेने आपल्या ग्राहकांसाठी फ्री सेवा देण्याचा निर्णय कोणत्या खुशीमध्ये घेतला? तर त्याचं कारण देखील समोर आलं आहे. नुकतीच भारतीय क्रिकेट संघानं मोठी कामगिरी केली आहे, टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे, तसेच होळीचा सण देखील आहे. या पार्श्वभूमीवर ओयोकडून आपल्या ग्राहकांसाठी ही खास ऑफर जारी करण्यात आली आहे.

फ्री स्टेची ऑफर कधीपर्यंत?

याबाबत माहिती देताना रितेश अग्रवाल यांनी म्हटलं की येत्या 18 मार्च पर्यंत ही ऑफर ग्राहकांसाठी सुरू असणार आहे. या खास ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ओयो हॉटेलच्या वेबसाईटवर जाऊन बुकिंग करावं लागणार आहे. बुकिंग करताना तुम्हाला तिथे कूपन कोडचा उपयोग करावा लागणार आहे, ही ऑफर केवळ पहिल्या दोन हजार ग्राहकांसाठीच मर्यादित आहे.  त्यामुळे तुम्हीही जर लवकर बुक केलं तर तुम्हालाही याचा लाभ मिळू शकतो.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)