युपीएससी – 2024 : राज्यातून 90 हून अधिक उमेदवार यशस्वी, एकूण 284 महिला उमेदवार उत्तीर्ण

युपीएससीच्या ( केंद्रीय लोकसेवा आयोग 2024 ) नागरी सेवा परीक्षाचा अंतिम निकाल आज अखेर जाहीर झाला आहे. देशभरातून एकूण 1009 उमेदवार या परीक्षेत यशस्वी झाले आहेत. या परीक्षेत शक्ती दुबे पहिल्या आहेत तर दुसरा क्रमांक हर्षिता गोयल तर महाराष्ट्रातील अर्च‍ित पराग डोंगरे हा तिसऱ्या क्रमांकावर उत्तीर्ण आला आहे.महाराष्ट्रातून 90 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे.अर्चित पराग डोंगरे राज्यातून प्रथम आले असून देशात 3 रा क्रमांक पटकाविला आहे. तर शिवांश सुभाष जगदाळे यांना 26 वा ऑल इंडिया रँक मिळाला आहे.पहिल्या 100 मध्ये राज्यातील 7 उमेदवार आहेत.

युपीएससी 2024 परीक्षेत एकूण 241 उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरुपाची आहे. अधिकृत निकाल आणि यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.यावर्षीच्या उत्तीर्ण उमेदवारामध्ये महाराष्ट्राचा डोंगरे अर्चित पराग (रोल क्र. ०८६७२८२) यांनी वेल्लोर येथील व्हीआयटीयेथून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये पदवीधर (बी.टेक.) केलेले असून युपीएससी परीक्षेत तत्वज्ञान हा पर्यायी विषय घेऊन देशभरात तिसरा क्रमांक पटकावला आहे.

राज्यातून यशस्वी झालेले उमेदवार

अर्च‍ित पराग डोंगरे (03)

शिवांश सुभाष जगदाळे (26)

शिवानी पांचाळ (53)

अदिती संजय चौघुले (63)

साई चैतन्य जाधव (68),

विवेक शिंदे (93),

तेजस्वी प्रसाद देशपांडे (99),

दिपाली मेहतो (105),

ऐश्वर्या मिलिंद जाधव (161),

शिल्पा चौहान (188),

कृष्णा बब्रुवान पाटील (197),

गौरव गंगाधर कायंदे पाटील (250),

मोक्ष दिलीप राणावत (251),

प्रणव कुलकर्णी (256),

अंकित केशवराव जाधव (280),

आकांश धुळ (295),

जयकुमार शंकर आडे (300),

अंकिता अनिल पाटील (303),

पुष्पराज नानासाहेब खोत (304),

राजत श्रीराम पात्रे (305),

पंकज पाटले (329),

स्वामी सुनील रामलिंग (336),

अजय काशीराम डोके (364),

श्रीरंग दीपक कावोरे (396),

वद्यवत यशवंत नाईक (432),

मानसी नानाभाऊ साकोरे (454),

केतन अशोक इंगोले (458),

बच्छाव कार्तिक रवींद्र (469),

अमन पटेल (470),

संकेत अरविंद शिंगाटे (479),

राहुल रमेश आत्राम (481),

चौधर अभिजीत रामदास (487),

बावणे सर्वेश अनिल (503),

आयुष राहुल कोकाटे (513),

बुलकुंडे सावी श्रीकांत (517),

पांडुरंग एस कांबळी (529),

ऋषिकेश नागनाथ वीर (556),

श्रुती संतोष चव्हाण (573),

रोहन राजेंद्र पिंगळे (581),

अश्विनी संजय धामणकर (582),

अबुसलीया खान कुलकर्णी (588),

सय्यद मोहम्मद आरिफ मोईन (594),

वेदांत माधवराव पाटील (601),

अक्षय विलास पवार (604),

दिलीपकुमार कृष्ण देसाई (605),

गायकवाड ऋषिकेश राजेंद्र (610),

स्वप्नील बागल (620),

सुशील गिट्टे (623),

सौरव राजेंद्र ढाकणे (628),

अपूर्व अमृत बलपांडे (649),

कपिल लक्ष्मण नलावडे (662),

सौरभ येवले (669),

महाराष्ट्रातील उर्वरित उमेदवार

नम्रता अनिल ठाकरे (671), ओंकार राजेंद्र खुंताळे (673), यश कनवत, (676) बोधे नितीन अंबादास, (677) ओमप्रसाद अजय कंधारे (679), प्रांजली खांडेकर (683), सचिन गुणवंतराव बिसेन (688), प्रियंका राठोड (696), अक्षय संभाजी मुंडे (699), अभय देशमुख (704),  ज्ञानेश्वर बबनराव मुखेरकर (707),  विशाल महार (714),  अतुल अनिल राजुरकर (727) , अभिजित सहादेव आहेर (734),  भाग्यश्री राजेश नायकेले (737),  श्रीतेश भूपेंद्र पटेल (746) शिवांग अनिल तिवारी (752), पुष्कर लक्ष्मण घोळावे (792), योगेश ललित पाटील (811), श्रुष्टी सुरेश कुल्ये (831), संपदा धर्मराज वांगे (839), मोहिनी प्रल्हाद खंदारे (844), सोनिया जागरवार (849), अजय नामदेव सरवदे (858), राजू नामदेव वाघ (871), अभिजय पगारे (886), हेमराज हिंदुराव पनोरेकर (922), प्रथमेश सुंदर बोर्डे (926), गार्गी लोंढे (939), सुमेध मिलिंद जाधव (942), आनंद राजेश सदावर्ती (945), जगदीश प्रसाद खोकर (958), विशाखा कदम (962), सचिन देवराम लांडे (964), आदित्य अनिल बामणे (1004)

725 पुरूष तर 284 महिला उमेदवार उत्तीर्ण

केंद्राच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी सप्टेंबर 2024 मध्ये मुख्य परीक्षा झाली होती. जानेवारी – एप्रिल 2025 दरम्यान परिक्षेत उत्तीर्ण उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 1009 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे.यामध्ये सर्वसाधारण गटातून 335, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) 109, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी)- 318, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – 160, अनुसूचित जमाती प्रवर्गातून-87 उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 725 पुरूष तर 284 महिला उमेदवार आहेत.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)