विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या आदल्या दिवशी, संजय राऊत यांनी दावा केला की महाविकास आघाडी १६० जागा जिंकेल आणि शरद पवारांना भेटण्याची शक्यता व्यक्त केली. भाजपवर टीका करताना त्यांनी गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवण्याचा आरोप केला आणि राष्ट्रपती राजवटीची शक्यता व्यक्त केली.
उद्या दहा नंतर मी सांगणार कोण मुख्यमंत्री असणार. महिलांनी गुलामी विरोधात बंड करून मतदान केलेल आहे. १६० जागा आम्ही जिंकत आहे, यावर आमची सर्वांसोबत चर्चा झाली, आज मी शरद पवार यांना भेटण्याची शक्यता आहे. १६० जागा जिंकल्यावर राज्यपालांनी कितीही प्रयत्न केले तरी निवडणूक पूर्व बहुमत आहे. त्यांना राज्यपालांना बोलवावं लागेल. महाराष्ट्रात जे नेते दिल्लीतून येतील त्यांना मँडेड घेऊनच यावं लागेल, कुठलाही वेळ न घालवता आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर भाजप घाई घाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवतील. एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन मणिपूरला जातील. तिथे गौतम अदानी यांनी दोन-चार रिसॉर्ट बांधलेले आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपला टोला लागावला.
देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अमेरिकन कोर्टामध्ये फसवणूक आणि लाचखोरीचा गौतम अदानी यांच्यावर आरोप केला आहे. त्यासोबतच आता गौतम अदानी यांच्या पुतण्याविरोधातही अटक वॉरंट निघाले आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही अदानींवर आरोप करताना त्यांच्या पाठिमागे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचं आरोप केला आहे.
महिलांच्या मतदानाचा टक्का वाढला असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करतो, लाडक्या बहिणीची मतं तुम्ही विकत घेतली आहेत का उद्या कळेल, लोकशाहीमध्ये सांगण्याचा बोलण्याचा स्वतंत्र आहे. जेवढं गौतम अदानी यांना स्वतंत्र आहे, गुन्हे करून सुटण्याचं तितकं सर्वांना असल्याचं संजय राऊत म्हणाले. आमच्या हातात बहुमत आलं तरी राष्ट्रपती राजवटीचा प्रयत्न करतील, पण आम्ही महाविकास आघाडीच सरकार स्थापन करू, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.