Maharashtra Class 11th Admission: दहावीचा निकाल लागल्यानंतर आज २१ मे २०२५ पासून ११ वीची ( FYJC – First Year Junior College )ऑनलाईन प्रवेश परिक्षा सुरु होणे अपेक्षित होते. मात्र महाराष्ट्रशासनाची वेबसाईट बंद पडली आहे. आज बुधवार ( २१ मे २०२५ ) अकरावीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु होणार होते. परंतू सरकारची बेवसाईट अंडर कन्स्ट्रक्शन असल्याचा संदेश या वेबसाईटवर येत आहे त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना मन:स्तापाला सामोरे जावे लागले आहे.
११ वीच्या प्रवेश प्रक्रियेला बुधवारपासून सुरु होणार होती. आता रजिस्ट्रेशनसाठी प्रक्रिया सुरू होणार होती.मात्र महाराष्ट्र शासनाची अकरावी प्रवेश प्रक्रियेची वेबसाईट हँग झाली आहे. ही लिंक लिंक २८ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता बंद होईल असे या बेवसाईटवर म्हटले आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ एक आठवड्याचा वेळ आहे. अशात पहिल्याच दिवशी सरकारी वेबसाईट ठप्प झाली आहे. विद्यार्थ्यांना एक आठवड्याचा वेळ दिलेला आहे.
आठवडाभरात अर्ज भरण्याचा प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परंतू पहिल्याच दिवशी वेबसाईट हँग झाल्याने राज्य शासनाचे माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. विद्यार्थी किमान एक आणि जास्तीत जास्त दहा कनिष्ठ महाविद्यालयांसाठी त्यांची पसंती देऊ शकतात. दहावी बोर्डानुसार यंदा महाराष्ट्र एफवायजेसी प्रवेशसाठी एकूण ९,२८१ कनिष्ठ महाविद्यालयांसाठी आणि कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील २० लाखांहून अधिक जागांसाठी अर्ज येणार आहेत.