मोबाईलवर शिवगाळवरुन दोन परिवारात हाणामारी, पण व्हिडिओ पाहिल्यावर हसणे नाही रोखू शकणार

भिवंडीतील हाणामारीचा व्हिडिओ व्हायरलImage Credit source: TV 9 Marathi

Thane Viral Video:  सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. परंतु ठाण्यातील भिवंडीचा दोन परिवारातील हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोन परिवार आपआपसात भिडले आहे. त्यांची हाणामारी सुरु असताना जे झाले त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दोन परिवाराच्या मारहाणीत तिसऱ्या व्यक्तीचे नुकसान झाले आहे. त्याचे छप्परच पडले आहे.

भिवंडी शहरातील दिवानशाह परिसरातील देऊनगर येथे किरकोळ वादातून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. त्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्या हाणामारीत अख्खे कुटुंब पत्र्याचे छतावर आले. त्यावेळी ते छत तुटून सर्वजण खाली घरात कोसळले. मोबाईलवर झालेल्या शिविगाळीच्या वादातून हा संघर्ष झाला होते. त्यामुळे तिसऱ्या व्यक्तीचे मोठे नुकसान झाले.

काय झाला होता प्रकार

मोइनुद्दीन नसरुद्दीन शेख आणि नसरुद्दीन इमामुद्दीन शेख या कुटुंबांमध्ये मोबाईलवर सुरू झालेला वाद शिविगाळीपर्यंत गेला. त्यानंतर वाद अधिकच तीव्र होत गेला. दोन्ही कुटुंबातील सदस्य इमारतीवरून शेजारील घराच्या पत्राच्या छतावर चढले. यावेळी जोरदार हाणामारी सुरू झाली. या झटापटीत आठ ते दहा महिला व पुरुष सहभागी होते. वाद उफाळल्यानंतर पत्र्याचे छत अचानक कोसळले. ज्यामुळे अख्खे कुटुंब खालील घरात पडले. सुदैवाने या घटनेत कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र घरमालकाच्या घराचे आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर दोन्ही कुटुंबाने मिळून त्या तिसऱ्या व्यक्तीचे नुकसान भरुन दिल्याचे सांगितले जात आहे.

हाणामारीचा हा व्हिडिओ मोबाईलवर चित्रित करण्यात आला. त्यानंतर तो व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. लोकांना हसू येत आहे. दरम्यान, या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)