अंड्यांपासून बनवलेला एक अतिशय साधा पण चविष्ट पदार्थ म्हणते ऑमलेट… ऑमलेट ही रेसिपी जगभरात सर्वांनाच आवडते. जर तुम्हाला तुमची भूक लवकर भागवण्यासाठी काहीतरी हेल्दी आणि चविष्ट खायचे असेल तर ऑमलेट या शिवाय दुसरा कोणता बेस्ट ऑप्शन असूच शकत आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का कोणाच्या डोक्यात पहिल्यांदा ऑमलेटची रेसिपी बनवण्याचा विचार आला असेल? किंवा पहिल्यांदा ऑमलेट कोणी बनवलं असेल? (Omelette Recipe History)
Omelette ला ऑमलेट हे नाव कसं पडलं?
ऑम्लेट हा शब्द फ्रेंच भाषेतून आला आहे. १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात ‘Cuisine Bourgeoisie’ या फ्रेंच पाककृती पुस्तकात त्याची पहिल्यांदा नोंद करण्यात आली. ‘अल्युमेट’ हा शब्द १४ व्या शतकापासून वापरात होता. ही डिश फ्रान्सच्या आधी कुठेतरी नक्कीच अस्तित्वात असेल. कारण जेव्हा आपण त्याच्या इतिहास पाहतो तेव्हा आपल्याला असे आढळते की ही डिश कोणत्याही एका ठिकाणाची किंवा काळाची निर्मिती नाही, तर ती वेगवेगळ्या देशांच्या संस्कृतींमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात तयार केली जाते.
अशी आहे ऑमलेट कथा…
ऑमलेटच्या इतिहासातील एक प्रसिद्ध कथा नेपोलियन बोनापार्टशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. असे सांगितले जाते की नेपोलियन आणि त्याचे सैन्य एका शहरातून प्रवास करत असताना त्यांना तिथे एका स्थानिक हॉटेलच्या मालकाने ऑमलेट खाण्यास दिले. नेपोलियनच्या तोंडात ती चव रेंगाळत राहिली. त्याला ते इतके आवडले की दुसऱ्या दिवशी त्याने शहरातून सर्व अंडी गोळा करून सैन्यासाठी एक मोठे आमलेट बनवण्याचा आदेश दिला.
आता ही कथा कितपत खरी किंवा खोटी हे माहिती नाही पण त्यानंतर, फ्रान्समधील बॅसियर्स शहरात दरवर्षी एक मोठं ऑमलेट तयार करण्याचा महोत्सव साजरा केला जाऊ लागला, ज्यामध्ये शेकडो अंड्यांपासून बनवलेले ऑमलेट संपूर्ण शहरातील लोकांना खाण्यास दिले जाते.
नेमका ऑमलेटचा शोध लावला तरी कोणी?
ऑमलेटचा शोध एका व्यक्तीने किंवा एका ठराविक ठिकाणाने लावला नाही. तर तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ऑमलेट हा पदार्थ तयार केला जात होता. कोणत्याही पदार्थाचे मूळ शोधणे साहाजिकच सोपे नाही, मात्र हे निश्चितपणे सांगता येईल की ऑमलेट हा पदार्थ जगाच्या प्रत्येक भागात आवडीने खाल्लं जातं. प्रत्येक ठिकाणी ऑमलेटला ऑमलेट हेच नाव नसेल पण रेसिपी मात्र सारखी असण्याची शक्यता आहे.