अरे देवा…चोरट्यांनी देवालाही सोडले नाही, चोरट्यांच्या या प्रकारानंतर पोलिसांनी…

Kalyan Crime News: नेहमी मौल्यवान वस्तूची चोरी करत असतात. काही भुरटे चोरटे छोट्या मोठ्या गोष्टींची चोरी करतात. मंदिरांमध्येही चोरी करण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. देवांची मौल्यवान मूर्ती चोरट्यांनी चोरली आहे. परंतु आता देवाची दगडी मूर्तीसुद्धा चोरट्यांनी सोडली नाही. गावातील पारंपारीक मूर्ती चोरुन चोरटे पसार झाले आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात घडली. आता पोलिसांनी वेगवेगळ्या टीम बनवत देवाला चोरणाऱ्या चोरट्याचा शोध सुरू केला आहे.

कल्याण तालुक्यातील खोणी गावातील एका शेतकऱ्याच्या शेतातील उपासनेसाठी असलेली वेताळेश्वर देवाची दगडी मूर्ती आणि दोन पितळी समया अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस वेताळेश्वर देवाच्या मूर्तीचा शोध घेत आहे

डोंबिवलीमधील खाणी गावात राहणाऱ्या मोतीराम बाळू जुमारे हे आपल्या गावाबाहेर असलेल्या जमिनीत शेती करतात. त्याच्या 20 गुंठे शेतात त्यांच्या कुटुंबाचा पूर्वजांपासून शेतात वेताळेश्वर देवाचा दगडी मूर्ती आहे. त्या मूर्तीजवळ दोन पितळी समया ठेवल्या आहेत. या ठिकाणी हे कुटुंब आणि गावकरी देवाची पूजा करतात. 6 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्या चुलत भाऊ या देवाची पूजा केली. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचे नातेवाईक पुन्हा पूजा करण्यासाठी शेतावर गेले असता त्या ठिकाणी वेताळेश्वर देवाचा दगडी मूर्ती आणि दोन पितळी समया गायब झालेल्या त्यांना दिसून आल्या.

घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गाव या ठिकाणी जमले. गावकऱ्यांनी आजूबाजूच्या परिसरात मूर्तीचा शोध घेतला. मात्र मूर्ती कुठलीही मिळाली नाही. या नंतर या गावकऱ्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत देव चोरी झाल्याचा गुन्हा दाखल केला. सध्या मानपाडा पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या टीम बनवत देवाला चोरणाऱ्या चोरट्याचा शोध सुरू केला आहे. मात्र या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)