Numerology News : ‘या’ जन्म तारखेचे लोक असतात भलतेच रोमॅंटिक; जोडीदारावर करतात प्रेमाचा वर्षाव

आपल्या आयुष्यात आपल्यावर प्रेम करणारा कोणीतरी असावा असं प्रत्येकाला वाटत असतं. आपलं प्रेम जीवन इतके चांगले असावे की जीवनातील सर्व दुःख कमी वाटतील, अशी सगळ्यांची इच्छा असते. एखाद्या चित्रपटातल्या नायका सारखं आपली काळजी घेणारा, आपल्यावर खूप प्रेम करणारा, रोमॅंटिक जोडीदार मिळाला तर आयुष्य स्वर्गासारखं वाटतं. पण असे रोमॅंटिक जोडीदार खरच असतात का? असा प्रश्न आपल्याला पडतो. पण अंकशास्त्रानुसार, काही विशिष्ट तारखेला जन्मलेले लोक हे अतिशय रोमॅंटिक आणि आपल्या जोडीदारावर प्रेमाचा वर्षाव करणारे असतात.

तुमच्याही आयुष्यात जर या जन्म तारखेला जन्मलेला जोडीदार असेल तर तुमचं आयुष्य प्रेमाने भरून जाईल. ही माणसं तुम्हाला कधीच प्रेमाची कमतरता भासू देणार नाही. आज आम्ही तुम्हाला अशा जन्मतारखांबद्दल सांगणार आहोत ज्या आपल्या प्रेम जीवनात आणि लग्नानंतर जोडीदाराचे प्रेम जीवन सुखी आणि आनंदी करतात.

या तारखेला जन्मलेले लोक प्रेम दाखवण्यात असतात माहिर

अंकशास्त्रानुसार, 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेले लोक खूप रोमँटिक मानले जातात. जोडीदाराचे प्रेम जीवन आनंदी बनवते. प्रेम दाखवण्याच्या बाबतीत ते खूप चांगले मानले जातात. जरी या तारखेला जन्मलेले लोक कोणावरही सहज विश्वास ठेवत नसले तरी एकदा त्यांनी कोणावर विश्वास ठेवला की त्यांच्याकडून खूप अपेक्षा असतात.

राजा किंवा राणीसारखे आयुष्य जगतात

2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक 2 असतो. त्याचा अधिपती ग्रह चंद्र आहे. या जन्मतारखेला जन्मलेल्या लोकांना विशेषतः चंद्राचा आशीर्वाद मिळतो, जो मनासाठी जबाबदार ग्रह आहे. अंकशास्त्रानुसार, या राशीच्या लोकांना राजा किंवा राणीसारखे जीवन जगणे आवडते. ते त्यांच्या जोडीदारांशी एकनिष्ठ असतात आणि प्रत्येक प्रकारे प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी ओळखले जातात. लग्नानंतर आपल्या जोडीदाराची काळजी कशी घ्यावी हे देखील आपल्याला चांगलेच माहिती असते. कायम रोमॅंटिक मूडमध्ये असलेले हे लोक बघायला मिळतात. मात्र त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून जास्त अपेक्षा असतात, त्यामुळे कधीकधी त्यांना अपेक्षाभंगाला देखील सामोरं जावं लागतं.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)