जर तुम्हाला पर्यटनाची आवड आहे. आणि तुम्ही परदेशात जाण्याची इच्छा बाळगून आहात. तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता व्हीसा शिवाय ५९ देशात आरामात प्रवास करु शकता. आता या यादीत फिलीपाईन्स या नव्या देशाचे नाव सामील झाले आहे. फिलीपाईन्स या देशाने आता भारतीयांना विना व्हीसा देशात फिरण्यासाठी मुक्तद्वार खुले केले आहे. फिलीपाईन्स हा देश भारतीयाचे आवडते पर्यटनस्थळ बनत चालले आहे.येथे फिरायला जाणे आता सहज शक्य झाले आहे. नवी दिल्लीतील फिलीपाईन्स दुतावासाने दिलेल्या माहीतीनुसार भारतीय आता दोन प्रकारच्या अल्पकालिन व्हीसा फ्री एन्ट्रीचा लाभ मिळवू शकतात.
नव्या नियमांनुसार आता भारतीय प्रवाशांना फिलीपाईन्सने आता दोन विविध प्रकारे व्हीसा फ्री प्रवेश सुरु केला आहे.
नव्या नियमांनुसार, भारतातील प्रवासी विभिन्न गटातील दोन वेगवेगळ्या व्हीसा फ्री नियमांद्वारे फिलीपाईन्सला जाऊ शकतात. भारतीय नागरिक व्हीसासाठी अर्ज केल्या शिवाय पर्यटनासाठी फिलीपीन्समध्ये १४ दिवसांसाठी येथे राहू शकतात.
मोफत व्हिसा प्रवेश कोणाला मिळू शकतो?
केवळ पर्यटनासाठी फिलीपाईन्सला भेट देणारा कोणताही भारतीय नागरिक
मुक्कामानंतर किमान सहा महिन्यांसाठी वैध असलेला पासपोर्ट
योग्य आणि तपासलेला निवासस्थानाचा पुरावा
मुक्कामादरम्यानचा खर्च भागवण्यासाठी पुरेसा निधी असल्याचा पुरावा (उदाहरणार्थ, बँक स्टेटमेंट किंवा रोजगार प्रमाणपत्र)
योग्य तपासलेले परतीचे किंवा पुढील तिकीट
फिलीपाईन्समध्ये नकारात्मक इमिग्रेशन इतिहास नसलेली व्यक्ती
व्हिसा-मुक्त प्रवेशासाठी पात्र न ठरणारे भारतीय प्रवासी ई-व्हिसा मार्ग वापरणे सुरू ठेवू शकतात. अधिकृत ई-व्हिसा पोर्टलद्वारे उपलब्ध असलेला 9 (अ) तात्पुरता पर्यटन व्हिसा 30 दिवसांच्या सिंगल-एंट्री मुक्कामाची परवानगी देतो.
भारतीयांना कोणत्या देशांत व्हिसा-मुक्त प्रवेश ?
फिलीपाईन्स आधी भारतीयांना एकूण 58 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेश होता. हेन्ले पासपोर्ट इंडेक्सनुसार, भारतीय नागरिक व्हिसाशिवाय 58 देशांना भेट देऊ शकतात. या देशांमध्ये इंडोनेशिया आणि मॉरिशससारखे देश देखील समाविष्ट आहेत. या यादीत अनेक आफ्रिकन देशांचाही समावेश आहे.
आफ्रिकेत, केनिया आणि झिम्बाब्वे सारख्या देशातही भारतीयांना व्हिसा-मुक्त प्रवेश उपलब्ध आहे. ओशनियामध्ये, फिजी, मायक्रोनेशिया, पलाऊ बेटे, वानुआतु सारखे देश देखील या यादीत आहेत.
संपूर्ण यादी पहा
अंगोला
बार्बाडोस
भूतान
बोलिव्हिया
ब्रिटिश व्हर्जिन बेटे
बुरुंडी
कंबोडिया
केप वर्दे बेटे
कोमोरो बेटे
कुक बेट
जिबूती
डोमिनिका
इथिओपिया
फिजी
ग्रेनेडा
गिनी-बिसाऊ
हैती
इंडोनेशिया
इराण
जमैका
जॉर्डन
कझाकस्तान
केनिया
किरिबाती
लाओस
मकाओ
मादागास्कर
मलेशिया
मालदीव
मार्शल बेटे
मॉरिशस
मायक्रोनेशिया
मंगोलिया
म्यानमार
मोन्सेरात
मोझांबिक
नामिबिया
नेपाळ
नियू
पलाऊ आइसलँड
कतार
रवांडा
सामोआ
स्नेगल
सेशेल्स
सिएरा लिओन
सोमालिया
श्रीलंका
सेंट लुसिया
सेंट किट्स आणि नेव्हिस
संत व्हिन्सेंट
टांझानिया
थायलंड
तिमोर-लेस्टे
त्रिनिदाद आणि टोबॅगो
तुवालु
वानू
झिम्बाब्वे