आता नो टेन्शन! पोटावरील चरबी झटपट कमी करणार खास ड्रिंक, कसं आणि कधी प्यायचं?

Reduce Belly Fat : सध्या सातत्याने वाढणारे वजन आणि पोटाची वाढणारी ढेरी ही खूप मोठी समस्या बनली आहे. वाढलेले वजन आणि पोटाच्या ढेरीमुळे अनेकदा तुमचे सौंदर्य बिघडते. तसेच आरोग्याच्याही अनेक समस्या निर्माण होतात. वाढलेल्या वजनामुळे अनेक आजारही होऊ शकतात. हे वजन कमी करण्यासाठी जिमला जाण्यापासून ते अगदी डाएट करण्यापर्यंत नानाविविध उपाय आपण करत असतो. पण तुम्हाला माहितीये का, एका खास पेयाच्या मदतीने तुम्ही पोटाची चरबी काही दिवसातच कमी करु शकता. विशेष म्हणजे हा उपाय अगदी सहज उपलब्ध आहे.

वजन कमी कण्यासाठी तुम्ही मेथीच्या बिया आणि लिंबाचा उपयोग करु शकता. मेथीच्या बिया या आरोग्यासाठी फारच फायदेशीर असतात. विशेषत: ज्या लोकांना रात्री शौचास जाण्याची समस्या असते, त्यांच्यासाठी मेथी ही अतिशय उपयुक्त ठरते. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी तुम्ही मेथीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकून पिऊ शकता.

मेथी आणि लिंबाचे फायदे

मेथी आणि लिंबाच्या पाण्यानं शरीर हायड्रेटेड राहतं. तसेच मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. यामुळे पचनासंबंधी समस्या दूर होतात. मेथीच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. तसेच यात व्हिटॅमिन सी देखील असते. यामुळे शरीरात वाढलेली चरबी कमी होण्यास मदत मिळते. विशेष म्हणजे मेथी आणि लिंबामुळे शरीरात जमा झालेले टॉक्सिन्स बाहेर पडतात, ज्यामुळे पोटाची ढेरी कमी होते.

मेथी आणि लिंबाचं ड्रिंक कसं बनवाल?

  • मेथी आणि लिंबाचं वेट लॉस ड्रिंक बनवण्यासाठी एक चमचा मेथीच्या बिया घ्या.
  • एक ग्लास पाणी घेऊन रात्रीभर मेथी पाण्यात भिजवून ठेवा.
  • सकाळी हे पाणी गरम करा आणि गाळून घ्या. त्यात थोडा लिंबाचा रस टाका आणि प्या.
  • तुम्ही भिजवलेल्या मेथीच्या बिया फेकण्याऐवजी चावूनही खाऊ शकता.

जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर तुम्ही एक चमचा मेथी 2 ग्लास पाण्यात टाका. यानंतर जोपर्यंत पाण्याला मेथीचा रंग येत नाही, तोपर्यंत पाणी उकळू द्या. यानतंर हे पाणी गाळून घ्या आणि कोमट झाल्यावर एक एक घोट प्या. यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)