नखं कापण्याशिवाय ‘या’ 4 कारणासाठी होतो नेल कटरचा वापर; तिसरा उपयोग कुणालाच नसेल माहीत

तुम्ही नेल कटरचा वापर कशासाठी करता असं विचारलं तर तुमचं उत्तर असेल नखं कापण्यासाठी. कदाचित तुम्ही आमच्या या प्रश्नावर हसालही. तुमचं उत्तरही बरोबर आहे. यात काही वादच नाही. पण नेल कटरचा वापर केवळ त्या एका कारणासाठी होत नाही. तर नेल कटरचे आणखीही चार उपयोग आहेत. यातील सर्वच्या सर्व उपयोग तुम्हाला माहीत आहेत. पण काही लोकांना निश्चितच ते माहीत नसतील. त्यामुळेच नेल कटर सारखी छोटी वस्तू कोणत्या कोणत्या कारणासाठी उपयोगी येते हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

नखं कापणं हे तर नेल कटरचं मुख्य कामच आहे. किंबहूना त्यासाठीच नेल कटर तयार करण्यात आलं आहे. महिला तर केवळ नखं कापण्यासाठीच नेल कटर खरेदी करतात. पण त्याचा वापर केवळ नखं कापण्यापुरताच मर्यादित नाहीये. याचा तुम्ही इतरही काही कामासाठी वापर करू शकता. नेल कटरचा कशा कशासाठी वापर केला जातो याची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. काही माहिती तर एमर्जन्सीच्या काळातही उपयोगी येणारी अशीच आहे.

धागा कापण्यासाठी

अनेकदा कपड्यामध्ये छोटा धागा निघतो. त्यामुळे हा धागा तोडण्यासाठी तो अनेकदा लोक खेचतात. त्यामुळे कपड्याची पूर्ण शिलाईच उसवते. परिणामी ते कपडे खराब होतात. तुमच्याबाबतीत कधी ना कधी असं घडलं असेल. पण तुमच्या बॅगेत नेल कटर असेल तर तुम्ही धागा खेचण्याऐवजी तो नेल कटरने कापू शकता. त्यामुळे शिलाई उसवणार नाही. आणि तुम्हाला हवा तेवढा धागा कापता येऊ शकतो.

टॅग हटवण्यासाठी

आपण कपडे खरेदी करतो तेव्हा प्रत्येक कपड्याला दोन दोन तीन तीन टॅग असतात. हे टॅग प्लास्टिक किंवा धाग्याने बांधलेले असतात. विशेष म्हणजे हा धागा अत्यंत पक्का असतो. तुम्ही हाताने कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तर तो तुटत नाही. उलट धाग्याने हात कापण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे तुम्ही हा धागा कापण्यासाठी नेल कटरचा वापर करू शकता. नेल कटरने हा धागा झटक्यात कापून तुम्ही टॅग हटवू शकता.

बाटलीचं झाकण उघडण्यासाठी

तुम्ही बाहेर आहात आणि तुम्हाला थंड पेयाच्या किंवा एखाद्या बॉटलचं झाकण उघडायचं असेल तर कधीच ते दाताने उघडू नका. चुकूनही तशी चूक करू नका. त्यामुळे दातांना इजा होण्याची किंवा दात पडण्याची शक्यता अधिक असते. दात हलण्याची शक्यताही अधिक असते. अशावेळी तुम्ही तुमच्यासोबत नेहमी नेल कटर ठेवा. नेल कटर ओपनरचं कामही करतो. त्यामुळे तुम्ही काही सेकंदात बॉटलचं झाकण उघडू शकता. नेल कटरला एक छोटा अटॅचमेंट असतो. त्याने तुम्ही सहजपणे बाटलीचं झाकण उघडू शकता.

की-चेन म्हणून वापर

आपण नेहमीच चाव्या ठेवण्यासाठी की-चेन ठेवतोच ठेवतो. तुम्हाला वाटलं तर तुम्ही नेल कटरचा की-चेनसारखा वापर करू शकता. छोट्या साईजचं नेल कटर की-चेन म्हणून वापरता येईल. मार्केटमध्ये असे छोटे नेल कटर मिळतात. ते तुम्ही खरेदी करू शकता.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)